पाडळसे धरणाला पैसा न दिल्यास सरकारच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करू….

धरणास निधी न देणाऱ्या शासनाच्या विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतसारा व लाईटबील भरू नये, महामोर्चा न्यावा आणि लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना जाब विचारावा.!’

पाडळसरे धरणाच्या बैठकीला ह्या लोकप्रतिनिधींची हजेरी….

आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, धुळे येथील माजी आमदार शरद पाटील यांनीच उपस्थित राहून पाडळसरे धरणासाठी आस्था दाखवली.

अमळनेर( प्रतिनिधी)पाडळसे धरण जनआंदोलन समितीतर्फे आज संपन्न झालेल्या आजी माजी लोकप्रतिनिधिंच्या बैठकीला ६ तालुक्यातील अनेकानी दांडी मारली.तर अमळनेरचे आ.शिरीष चौधरी, मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील,धुळे ग्रामिण चे मा.आ.प्रा.शरद पाटील आदींनी आंदोलक म्हणून
उपस्थित दिली.’धरणास निधी न देणाऱ्या शासनाच्या विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतसारा व लाईटबील भरू नये, महामोर्चा न्यावा आणि लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना जाब विचारावा !’ असा विचार प्रवाह यावेळी समोर आला.
जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी यांनी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मार्गदर्शन करण्यासाठी व शासन दरबारी पुढाकार घेणेसाठी आवाहन केले.प्रा.शिवाजीराव पाटील यांनी समितीचे पत्र वाचून दाखविलें तर धरणाची आजची तांत्रिक माहिती, सद्यस्थितीतील परिस्थितीत करावयाच्या प्रयत्नांची माहिती दिली. याप्रसंगी आ.शिरीष चौधरी यांनी ‘धरण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणेसाठी सर्वांनी राजकिय मानपान बाजूला ठेवून एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. राजकिय हेवेदाव्यातून व श्रेयवादातूनच शेवटच्या क्षणी धरणाच्या प्रश्नाला खूप प्रयत्न करूनही कलाटणी दिली जाते. धरणाला पैसा न दिल्यास सरकारच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करू या. प्रचाराला येणाऱ्या मंत्र्यांना समितीच्या सोबत जनतेसह निवेदन देऊ असे आवाहन करतांना येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात समितीला पाठीशी घेऊन मी एक आंदोलक म्हणून विधिमंडळात लढायला पुढे राहील.नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही म्हणून आंदोलकांनी पुढे निर्णय घ्यावा मी समितीच्या सोबत आहे.असे जाहिर केले. धुळे ग्रामिण चे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी, जळगांव जिल्ह्याच्या नेतृत्वाने धरणाचा प्रश्न गांभीर्याने न घेतल्याने धरण मागे पडले आहे .पावसाळी अधिवेशन काळात जनरेटा वाढवावा. धरणक्षेत्रातील ग्रामिण जनतेने शेतसारा, लाईटबील भरू नये, लोकजागृती करून प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या मोर्चा काढावा , लोकसभा निवडणुकीत धरणाचा विषय ज्यांच्या अंजेंडावर असेल त्यांनाच मतदारसंघात फिरू द्या!लोकसभा निवडणुकीतील कोणत्याही उमेदवाराच्या पराभवाला पाडळसे धरण कारणीभूत राहील! असे सांगितले. यावेळी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी धरणाचा इतिहास सांगितला. धरणाचा प्रश्न अजून समजलेला नसल्याची खंत व्यक्त करून राज्याचा जलसंपदा विभागाचा तसेच जळगांव बजेट वाढला तरी अमळनेरच्या धरणाला अतिशय कमी निधी दिल्याने अमळनेरकरांच्या तोंडाला पाने पुसली.तर भविष्यात धरणातील पाणी लिफ्ट ने उचलण्यासाठी आवश्यक असे विज प्रकल्प सध्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी पळविल्याचा आरोप ही केला.तर अधिकारीही दिशाभूल करणारे आकडे देतात असेही सांगितले. मी आंदोलनासोबत असून पावसाळी अधिवेशनात अजून संधी आहे सध्याच्या आमदारांनी समितीसह प्रयत्न करावे असे सांगितले.
यावेळी नामदेव पाटील, हिरामण कंखरे,अजयसिंग पाटील ,योगेश पाटील, प्रा.सुनिल पाटिल, रणजित शिंदे, चंद्रकांत साळी,प्रशांत भदाणे, हिरालाल पाटील यांनीही सहभाग घेतला.तर समितीचे एस.एम.पाटील, डी.एम.पाटील, सुनिल पवार,महेश पाटील, आर.बी.पाटील देविदास देसले, निंबा पाटील, रामराव पाटील, पुरुषोत्तम शेटे, सौ.वसुंधरा लांडगे,सुपडू बैसाने यांच्यासह सुनिल भामरे, शिवाजी पाटील, गोविंदा पाटील,मगणं शिंगाने, शालिग्राम पाटील, कुंदन खैरनार, सुहास एलमामे,परमेश्वर पाटील, रविंद्र पाटील,ज्ञानेश्वर पाटील आदिसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ह्या दांडी मास्टर लोकप्रतिनिधींनी मारली दांडी……

पाडळसरे धरणाविषयी आपली भूमिका मांडून निधी उपलब्ध करण्यासाठी लाभ क्षेत्रातील सहा तालुक्यातील आजी माजी आमदार व खासदार यांना आजच्या विषेश सभे बाबत पाडळसरे धरण जनआंदोलन समिती कडून निमंत्रित करण्यात आले होते त्यात आमदार स्मिता वाघ ,डॉ. बी एस पाटील, गुलाबराव पाटील, अमृतराव पाटील,पारोळ्याचे आमदार डॉ सतिष पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील,धरणगावचे आमदार मंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार गुलाबराव देवकर, चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार अरुणभाई गुजराथी, कैलास पाटील, जगदीश वळवी, दिलीप सोनवणे,धुळ्याचे आमदार कुणाल पाटील, रोहिदास पाटील, शिंदखेड्याचे आमदार मंत्री जयकुमार रावल, माजी आमदार डॉ हेमंत देशमुख शिक्षक आमदार किशोर दराळे, पदवीधर आमदार सुधीर तांबे ,खासदार ए टी नाना पाटील, खासदार केंद्रीय राज्य मंत्रि डॉ सुभाष भामरे माजी खासदार वसंतराव मोरे, एम के पाटील, विजय नवल पाटील, ईश्वरलाल जैन यांना वरिल बैठकीत उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले होते.
वरिल लोकप्रतिनिधीना पाडळसरे धरणाविषयी आस्था नाही फक्त धरणाचे नावावर मतांचा जोगवा मागून राजकीय पोळी भाजून घेतली असे जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते व उपस्थिती शेतकऱ्यांनी बोलून दाखविले.

धरणाच्या लाभक्षेत्रातील सहा तालुक्यातील अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी आज गैरहजर राहिले. शासनाचे हजारो रुपये मानधन व पेन्शन घेणारे व जनतेच्या प्रश्नावर लढणाऱ्या आंदोलनास ज्या आजी माजी आमदार, खासदारांबद्दल यावेळी तिव्र संताप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *