अमळनेर – येथील प्रताप महाविद्यालयाच्या आवारातून शिरसोली ता जळगाव येथील एक १७ वर्षीय मुलीला कुऱ्हाळदा ता जळगाव येथील तरुणाने फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी मुंबई येथुन ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध बलात्कार व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तरुणीला पळवून नेल्याची घटना १६ रोजी दुपारी १ वाजता घडली होती
शिरसोली ता जळगाव येथील एक १७ वर्षीय मुलगी १२ रोजी दाजीबा नगर मधील आपल्या नातेवाईकांकडे आली होती १६ रोजी ती नातेवाईक मुलींसोबत प्रताप महाविद्यालयात गेली होती दुपारी १ वाजता दिनेश रमेश सोनवणे रा कुऱ्हाळदा ता जळगाव याने तिला फूस लावून पळवून नेले मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भादवी ३६३, ३६६ अ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील करीत होते मुलाच्या भ्रमणध्वनी चे सी डी आर व लोकेशन मिळवून पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम पाटील यांनी तरुणी व दिनेश याला अटक केली मुलीला पालकांचं ताब्यात देण्यात आले आहे