अमळनेर येथील पैलाड परिसरातील ज्ञानेश्वर रमेश पाटील वय ४५ ,यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत वृत्त असे की सदर इसम सकाळी १० वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर याने आपल्या राहत्या घरी आतून कडीकोंडा लावून गळफास घेतली आईच्या लक्षात आले व आईने आपल्या मुलाचे देह पाहून हंबरडा फोडला.
ज्ञानेश्वर च्या खिश्यात एक चिठी सापडली असून त्यात , मी स्वताहून आत्महत्या करीत आहे माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये. अशी चिठ्ठी आढळली आहे. त्याच्या पश्चात आई , पत्नी, एक मुलगा,मुलगी आहे
सदर घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद पोलीसात करण्यात आली असून पुढील तपास अमळनेर पोलीस कॉन्स्टेबल सुभाष सांळूखे करीत आहे करीत आहे.