अमळनेर(प्रतिनिधी)नागरी व ग्रामिण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत अमळनेर विधानसभा मतदार संघासाठी 89 लाख मंजूर असल्याची माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली.
सदर कामांसाठी आ चौधरी यांनी दिनांक 27 जानेवारी 2019 दिलेल्या पत्रात 3 कोटी 25 लक्ष मागणी केलेल्या पत्रातील अ न 1,2,3,9,13,16,27,28,29,34, 36,38,42,52,59,63 नं ची कामे मंजूर झाली आहेत, यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचीही भेट त्यांनी घेतली होती,अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन तब्बल 89 लाखांचा निधी मंजूर झाल्याने ग्रामिण भागात अनु-जाती वस्त्यांमध्ये उल्लेखनीय विकासकामे होणार आहेत.या मंजुरी बद्दल आ चौधरीं यांनी सामाजिक न्याय मंत्री ना. बडोले व राज्यमंत्री ना कांबळे यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.
अशी होणार विकासकामे
भोलाने येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे 5 लाख, पिंपळकोठा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे 5 लाख, दळवेल येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे 5 लाख, आबांपिंप्री येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे 5 लाख, रत्नापिंप्री येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे 5 लाख, सारबेटा खु सभागृह बांधणे 10 लाख,मुडी येथे काँक्रीट गटार व काँक्रीटीकरण रस्ता करणे 9 लाख, मंगरूळ येथे काँक्रीटीकरण रस्ता करणे 10 लाख, मुडी प्र ड येथे काँक्रीटीकरण रस्ता व संरक्षण भिंत बांधणे करणे 8 लाख, जळोद येथे शौचालय बांधणे 8 लाख, भरवस येथे काँक्रीटीकरण रस्ता करणे 3 लाख, लोणपंचम येथे पाणी पुरवठा पाईप लाइन व भूमिगत गटार बांधकाम करणे 6 लाख, दरेगाव येथे संरक्षण भिंत बांधणे 3 लाख, कलाली येथे पेव्हर ब्लॉक बसविणे 5 लाख, गोवर्धन येथे भूमिगत काँक्रीट गटार बंधने 5 लाख,आदी विकासकामे होणार आहेत.