अमळनेर चोपडा – सावित्रीबाई फुले ह्यांनी शिक्षणाची पेटविलेली ज्योत रूपयाच्या तेजापुढे फिकी होवु पाहत असुन पैशाअभावी हजारो गरजवंत शिक्षणाला मुकण्याची वेळ येवुन ठेपली आहे.अशातच गरिबीची झळ सोसत असलेल्या आदिवासी ,दीन-दलीत विद्यार्थीनींना मोलाचा हात वेळीच देणे गरजेचे असल्याचे परखड मत जळगावच्या पवन इंटरपप्रायजेस चट्ई उद्योग समूहाच्या संचालका सौ.अनिताताई रामदास कोळी यांनी व्यक्त केले
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पवन इंटरपप्रायजेसतर्फे कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रारंभी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर आदिंच्या पप्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर विद्यार्थिनींनी जन्म दिला आईने मला.. उपकार हा मोठा झाला… हे गीत गाऊन आईची महिमा सांगितली.यावेळी आदिवासी विद्यार्थीनींना सौ. अनिता कोळी यांचे हस्ते चटनी व फळे वाटप करण्यात अध्यक्षीय भाषणात वसतीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ यांनी जागतिक पातळीवर चकाकणारे महिलांचे साहस प्रत्येक विद्यार्थीनीत पप्रत्यक्ष उतरविण्याची गरज आहे.तसेच आजच्या स्थितीत महिलांवर घडणारे अन्याय,अत्याचार वाढला असून त्याचा खात्मा करण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी सौ.अनिता कोळी,पुजा कोळी, महेश कोळी,पवन कोळी, सचिन कोळी,अधिक्षिका कावेरी कोळी,अध्यक्ष महेश शिरसाठ , कर्मचारी वर्ग,व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.आभार संस्थेचे सचिव संजय शिरसाठ यांनी मानले.