रस्ता क्रॉक्रीटीकरण,पेव्हर ब्लॉक,संरक्षण भिंत,पाईपलाईन इत्यादी कांमाचा समावेश
अमळनेर(प्रतिनिधी) राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फ़त ग्रामीण भागातील दलित वस्तीत रस्ता क्रॉक्रीटीकरण,संरक्षणभिंत,पाईपलाईन,
पेव्हर ब्लॉक इत्यादी विकासकांमसाठी आ स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने ८९ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.
ग्रामीण भागातील दलित वस्तीत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी आ स्मिता वाघ राज्य शासनाकडे पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून दिला आहे.सदर कांमाना निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले,राज्यमंत्री दिलीप कांबळे ,जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे आभार मानले आहे.तर दलित समाजबांधवानी आ स्मिता वाघ यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे.
खालील कामांना निधी उपलब्ध
१)भोलाने ता पारोळा येथे रस्ता क्रॉक्रीटीकरण करणे-५ लक्ष २)पिंपळकोठा ता पारोळा येथे रस्ता क्रॉक्रीटीकरण करणे-५ लक्ष ३)दळवेल ता पारोळा येथे रस्ता क्रॉक्रीटीकरण व गटार बांधकाम करणे-५ लक्ष ४)अंबापिंप्री ता पारोळा येथे रस्ता क्रॉक्रीटीकरण करणे-५ लक्ष ५)रत्नापिंप्री ता पारोळा येथे रस्ता क्रोक्रिटिकरण करणे-५ लक्ष ६)सारबेटा खु ता अमळनेर येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे-१० लक्ष ७)मुडी ता अमळनेर येथे रस्ता क्रॉक्रीटीकरण व गटार बांधकाम येथे-०९ लक्ष ८)मंगरूळ ता अमळनेर येथे रस्ता क्रॉक्रीटीकरण करणे १० लक्ष ९)मुडी प्र डांगरी येथे रस्ता क्रॉक्रीटीकरण व सरंक्षण भिंत बांधकाम करणे ८ लक्ष १०)जळोद येथे शोचालय बांधकाम करणे ५ लक्ष ११)भरवस येथे पोहच रस्ता क्रॉक्रीटीकरण करणे ३ लक्ष १२)लोनपंचम येथे पाणीपुरवठा पाईपलाईन व गटार बांधकाम करणे ६ लक्ष १३)दरेगांव येथे सरंक्षण भिंत बांधकाम करणे ३ लक्ष १४) कलाली येथे पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लक्ष १५)गोवर्धन येथे भूमिगत गटार बांधकाम करणे ५ लक्ष