फार्मसी महाविद्यालयात पुस्तकांचे पूजन करून पुस्तक दिनाचे महत्व केले विषद

अमळनेर (प्रतिनिधी)  स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त  ग्रंथालयात ग्रंथपाल सुजित अमळकर व शिवाजी पाटील यांनी पुस्तकांचे पूजन केले. उपस्थित मान्यवरांनी पुस्तक दिनाचे महत्व सांगितले.

प्राचार्य डाॅ. रवींद्र सोनवणे यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयास ११००० रुपये देणगी स्वरूपात दिले. तसेच धार्मिक, अभ्यासप्रणाली उपयुक्त व स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके देणगीच्या स्वरूपात प्राचार्य डाॅ. रविंद्र सोनवणे, प्रा.देवेश भावसार, प्रा. सतिष ब्राम्हणे यांनी पुस्तक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील ग्रंथालयात दिली. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. रविंद्र माळी, प्रा.अनिल बोरसे  प्रा. प्रितम पाटील, प्रा. प्रफूल्ल चव्हाण, प्रा. स्वप्नाली महाजन, प्रा. सुनिता चोपडे, प्रा. वर्षा पाटील प्रा. छाया महाजन, प्रा. शिवानी शर्मा, प्रा. वैशाली कुलकर्णी, प्रा.गीतांजली पाटील, प्रा. प्रगती पाटील, प्रा. प्रियंका महाजन तसेच अनिल महाजन, कविता शिंपी, महेश सोनजे, ज्ञानेश्वर चौधरी,अतूल साळुंके, प्रकाश पाटील, जगदीश सोनवणे, यश शिंपी, किशोर बुलके व कैलास कड यांची उपस्थिती होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *