अमळनेर (प्रतिनिधी) भारती विद्यापीठ, पुणे संचलित शालेय जनरल नॉलेज परीक्षेत साने गुरुजी विद्यालयाचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी मानव रावसाहेब पाटील याने 200 पैकी 148 गुण प्राप्त करून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला .
त्याचे संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संजीव पाटील, शिक्षक वृंद यांनी कौतुक केले आहे. त्यास किशोर अहिरराव यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचा पुढील महिन्यात पुणे येथे सत्कार होणार आहे.