अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर शहरातील ताडेपुरा प्रभागातील असंख्य युवकांनी,भाजपच्या कार्यशैली वर विश्वास ठेवत भाजप जिल्हा अध्यक्ष,उदय वाघ यांच्या नेतृत्वाखाली व शहराध्यक्ष शितल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात अधिकृत प्रवेश घेतला.जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी भाजपाचे फटके टाकून सर्व युवकांचे पक्षात स्वागत केले.
भाजपाचे शहर उपाध्यक्ष चंद्रकांत कंखरे यांच्या सहयोगाने या सर्व युवकांनी भाजपात प्रवेश घेतला. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष शीतल देशमुख,उपाध्यक्ष चंद्रकांत कंखरे,सरचिटणीस उमेश वाल्हे, दिलीप ठाकूर उपस्थित होते,प्रवेश करणाऱ्यांमध्ये विजय पाटील,प्रशांत पाटील,अनिल ठाकरे, राहुल पाटील, सागर धनगर,नामदेव,पाटील,विक्की लोणारी,भूषण पाटील,समाधान मिस्तारी, ज्ञानेश्वर पाटील आदींचा समावेश आहे,यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केंद्र व राज्यात भाजपा नंबर वनचा पक्ष असताना अमळनेर शहरात शहराध्यक्ष शितल देशमुख यांच्या नेतृत्वात युवकांचे संघटन मोठया प्रमाणात वाढले असून यामुळे ग्रामिण भागासोबत शहरात देखील भाजपा नंबर वनच असल्याचा दावा वाघ यांनी केला.दरम्यान देशमुख यांनी शहराध्यक्षांची धुरा सांभाळल्यापासून प्रत्येक प्रभागातील युवकांना त्यांनी भाजपाच्या प्रवाहात आणून शहराची स्थिती मजबूत केली आहे,यामुळे शहराची बूथ यंत्रणा देखील सक्षम झाली असून त्याचा फायदा पक्षाला आगामी निवडणुकीत निश्चितपणे दिसून येणार आहे.तसेच पक्षाने दिलेले सर्वच कार्यक्रम उत्कृष्टरींत्या राबविले असून स्वकल्पनेतून देखील विविध कार्यक्रम राबवून भाजपचे वातावरण क्रियाशील ठेवले आहे.यामुळे पक्ष नेतृत्वाने देखील त्यांचे कौतुक केले आहे.