अमळनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप , आणि हिंदू संघटनांना शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केल्याने अनर्थ टळला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे
दुपारी 3 वाजेच्या सुमारास एक व्हीडिओ व्हायरल झाला त्यात एक इसम पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजप आणि हिंदू संघटनांना शिवीगाळ केली त्यात त्याने स्वतःचे नाव मिथुन ओवेसी असे सांगत होता आणि एम आय एम नेता ओवेसीचे नाव ही घेतले आहे व्हीडिओ व्हायरल होताच शहरात तणाव निर्माण झाला भाजप आणि बजरंग दल , इतर हिंदू संघटनांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली मात्र अवघ्या 15 मिनिटात डी वाय एस पी रफीक शेख, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील , शरद पाटील यांना पाठवून माजी नगरसेवक फिरोज मिस्त्री यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक केली.
त्याला पॉलिसी खाक्या दाखवताच त्याने स्वतःचे नाव अमिनोद्दीन चिरागोद्दीन शेख नाव असल्याचे सांगितले भाजप शहराध्यक्ष शीतल देशमुख यांच्या फिर्यादीनुसार आरोपी अमिनोद्दीन याच्याविरुद्ध भादवी 294 , 153 , सायबर गुन्हे कलाम 66 अ , 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी वेळीच अटक केल्यामुळे शहरातील विविध ठिकाणी जमा झालेली गर्दी पांगली व तणावपूर्ण शांतता निर्माण झाली तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर करीत आहेत तीन अधिकारी व 30 पोलिसांनी रात्रभर शहरात बंदोबस्त ठेवला होता