धरण संघर्ष समितीचे शेकडो कार्यकर्ते “जेलभरो” आंदोलनात सहभागी…

जेलभरो आंदोलन

अमळनेर (प्रतिनिधी) ‘पाडळसरे धरण झालेच पाहिजे!’ जय जवान,जय किसान च्या घोषणा देत आंदोलनकर्ते, शेतकरी, महिला,युवक,व राजकिय पदाधिकारी यांनी शेकडोंच्या संख्येने स्वतःला अटक करवून घेतली.पाडळसे धरण जनआंदोलनाच्या १२ व्या दिवशी समितीच्या जेलभरो आंदोलनात शेकडो (२७५) लोकांनी स्वतःची अटक देत आंदोलन उग्र केले. जेलभरो आंदोलनाच्या दिवशी निम्न तापी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता, तहसीलदार हे पोलीस निरीक्षकांना घेऊन आंदोलन स्थळी दाखल झाल्याने १२ व्या दिवशी प्रशासनाला जाग आली.

जन आंदोलनास १२ व्या दिवशी तहसीलदार सौ.ज्योती देवरे व पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी भेट दिली

आंदोलनात जेलभरो करतांना पोलिसांच्या वाहनात उत्स्फूर्तपणे अटक देण्यासाठी मोठी झुंबड उडाली. समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या आधीच घोषणा देणाऱ्या शेकडो शेतकरी, युवक , राजकिय कार्यकर्त्यांनी वाहन भरून गेले.पोलिसांनी १२.१५ पासून आंदोलन कर्त्यांना अटकेचे सत्र सुरू केलं. १ तासाने दुपारी आंदोलन स्थळी सुटका केल्याचे जाहिर केले.

जन आंदोलनास १२ व्या दिवशी निम्न तापी प्रकल्प च्या कार्यकारी अभियंता सौ.रजनी देशमुख यांनी भेट दिली

पाडळसरे धरण जनआंदोलन गेल्या १२ दिवसापासून वाढत्या लोकप्रतिसादासह पेटत असताना काल जेलभरो आंदोलन होत असतानाच आज निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरण च्या कार्यकारी अभियंता सौ.रजनी देशमुख या सहकाऱ्यांसह समितीला भेटायला आल्यात. नवनियुक्त तहसिलदार ज्योती देवरे यांनीही यावेळी भेट दिली आंदोलनाची वाढती तीव्रता व जनक्षोभ लक्षात घेता आम्ही जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शासनाकडे सर्व माहिती देत आहोत! समितीने आंदोलन थांबवावे अशी विनंती केली तर समितीने जेलभरो करणारच असे जाहीर केले.यावेळी पोलिस निरीक्षक श्री.अनिल बडगुजर यांनी आंदोलनस्थळीच जन आंदोलनाचे नेते सुभाष चौधरी, शिवजीराव पाटिल,आ.डॉ. सतिष पाटिल,मा.आ. कृषिभूषण पाटिल, हिरामण कंखरे, रणजित शिंदे,डी.एम. पाटील, अजयसिंग पाटील, रामराव पवार, सुनिल पाटील, योगेश पाटील,रविंद्र पाटील, महेश पाटील,प्रशांत भदाणे, देविदास देसले,सतिष काटे, आर. बी. पाटील, यांच्यासह चोपडा येथिल महिला नेत्या सौ.माधुरी पाटील, सौ.वसुंधरा पाटील, सौ.प्रतिभा पाटील,सौ.अपेक्षा पवार ,सौ.सोनकुसरे व निंभोरा येथील असंख्य महिलासह अटक दिली.
जेलभरो आंदोलन सुरू होण्यापूर्वी ये मेरे वतन के लोगो! हे देशभक्तीपर गीत म्हणत शहिदाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जनआंदोलन समितीच्या जेलभरो आंदोलनात किसान मोर्चाचे प्रा. शिवाजीराव गांधलीकर, हिरालाल पाटिल,ऋषिकेश गोसावी, प्रा. अशोक पवार, गणेश पवार,श्रावण पाटिल,सुपडु बैसाणे, पुरुषोत्तम शेटे, रा.कॉ. चे सचिन पाटील, शिवाजीराव पाटील, मुख्तार खाटीक, काँग्रेस चे संदीप मल्हारी पाटील,गोकुळ पाटिल,प्रविण जैन ,युवा मंच चे मनोज शिंगाने व युवक कार्यकर्ते, प्रा.सुरेश पाटील, संजय पाटील, सुशिल भोईटे , बहुजन क्रांती मोर्चा,विविध सामाजिक संघटना, असोशियशन, मंडळांचे पदाधिकारी तसेच मुस्लिम युवा कार्यकर्ते गुलाम नबी,नावेद शेख व कार्यकर्ते यांच्या सह अमळनेर, चोपडा, पारोळा येथिल शेतकरी, ग्रामस्थ, युवक, महिला तसेच मुस्लिम कार्यकर्ते तसेच राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते मोठ्या ही यावेळी सहभागी झाले.

आंदोलन सुरूच राहणार!

पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे आंदोलन यापुढेही टप्या टप्याने सुरूच राहिल!असे जाहीर करण्यात आले.

५ मार्च ला कार्यकारी अभियंता,निम्न तापी प्रकल्प कार्यालयावर समिती निधीचा जाब विचारण्यासाठी धडक देणार आहे. तर ७ मार्च ला ११ वाजता पाडळसरे धरणावर जलसत्याग्रह आंदोलन जाहीर करण्यात आले आहे.तर १० मार्च ला समितीतर्फे आंदोलनाची पुढील दिशा व निधी मिळविण्यासाठी मार्गदर्शन मिळविणेकरिता अमळनेर, चोपडा,पारोळा,धरणगाव,शिंदखेडा,धुळे येथिल आजी माजी आमदार, खासदार,आजी माजी मंत्री,लोकप्रतिनिधी ची बैठक आयोजित करण्यात आल्याचे सुभाष चौधरी, यांनी तर साखळी उपोषण संपल्याचे शिवाजीराव पाटील यांनी जाहिर केले. साखळी उपोषण व जेलभरो आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल समितीतर्फे रणजित शिंदे यांनी आंदोलनला, सहकार्य करणारे पत्रकार बांधव व चोख पोलीस बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलिस प्रशासनाचे ऋण व्यक्त करून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *