भरारी पथक तैनात, परिसरात अवजड वाहन पकडली
अमळनेर (प्रतिनिधी) – गेल्या काही महिन्यांपासून प्रांतधिकारी संजय गायकवाड व तहसिलदार प्रदीप पाटील यांच्या कार्यकाळात अमळनेर तालुक्यात वाळू तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. याबाबत जनतेमधुन महसुल विभागा बद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र वाळु तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी कर्तव्य निष्ठ प्रांताधिकारी म्हणून ओळखले जाणारे सिमा अहिरे व तहसिलदार ज्योती देवरे यांनी स्वतः धडाकेबाज कारवाई करण्यास सुरुवात केली असून अवैध वाळु उपसा रोखण्यासाठी भरारी पथक तैनात केले आहे. या पथकाने अमळनेर परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारा १ ट्रक, पकडला असून वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
अमळनेर तालुक्यात वाळूला काळे सोने म्हणून ओळखले जाते या वाळूवर परजिल्ह्यातील वाळू तस्करांचा डोळा असल्याचे सिद्ध झाले असून त्यांच्याकडून अनेक वेळा महसूल अधिकाऱ्यांवर मोठे हल्ले झाले आहेत. तहसीलदार ज्योती देवरे यांनी भरारी पथक तयार करून ते स्वतः रात्री कारवाई करत आहेत.
शनिवारी मध्यरात्री रात्री २ च्या सुमारास जळोद रस्त्यावर ट्रकमधून वाळु वाहतूक करताना परवानगी नसतानाही रात्री वाहतुक करतांना तहसिलदार ज्योती देवरे यांनी कुणाचा हि मुलाहिजा न करता धडाकेबाज कारवाई करण्याचा सपाटा लावण्याने वाळु तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले असुन या कारवाईच जनतेमधुन स्वागत करण्यात येत आहे.या कारवाईत पोलिस प्रशासनाचे देखील सहकार्य होते.