‘फसणवीस सरकारचा धिक्कार असो’, गिरीश महाजन यांच्या विरोधातही घोषणाबाजी करुन निषेध केला
अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेरात जनआंदोलन आणि लोक प्रतिनिधींच्या प्रयत्नांना शासनाने हरताळ फासला तुटपुंजी निधीमुळे संतप्त विविध संघटना उग्र आंदोलन करीत अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरले आहे.
२०१९ च्या अर्थसंकल्पात पाडळसरे धरणासाठी केवळ ३२ कोटी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
पाडळसरे धरण गेल्या २१ वर्षापासून राजकीय अनास्थेने रखडले आहे. याच पार्श्वभुमीवर काल सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो पोस्टर जाळून शासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, बाळू पाटील, योजना पाटील, संदीप पुनाजी पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी ‘फसणवीस सरकारचा धिक्कार असो’, गिरीश महाजन यांच्या विरोधातही घोषणाबाजी करुन निषेध केला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी धरण जनआंदोलन समितीच्या उपोषणास सहभागी झालेत. पाडळसरे धरणासाठी विद्यमान आमदारांचे अपयश असल्याचा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.