कब्रस्थान संरक्षण भिंत व बोहरा समाजाच्या कब्रस्थान साठी रस्त्याचा समावेश
अमळनेर (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फ़त शहरातील कब्रस्तानास संरक्षण भिंत बांधकासाठी १० लाख तसेच दाऊदी बोहरा समाजाच्या क्रबरस्थान पोहच रस्ता व अंतर्गत रस्ते बांधकामासाठी प्र १० लाख असा एकूण २० लाखांचा निधी आ सौ स्मिता वाघ यांच्या प्रयत्नानी मंजूर झाले आहे.
दाऊदी बोहरा समाजाच्या कब्रस्थांनमध्ये जाण्यासाठी रस्त्याची मोठी अडचण असल्याने हि समस्या दूर व्हावी यासाठी बोहरा समाजाच्या शिष्टमंडळाने आ स्मिता वाघ यांची भेट घेऊन वरील प्रमाणे सोई सुविधा निर्माण करण्याची मागणी केली होती,तसेच मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानास देखील संरक्षण भिंतीची आवश्यकता असल्याने आ सौ वाघ यांनी राज्याचे असल्पसंख्यांक विकास मंत्री विनोद तावडे ,जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून हा निधी मिळविण्यात यश मिळविले.सदर कामाच्या मंजुरी बद्दल त्यांनी ना तावडे व ना महाजन यांचे आभार मानले आहेत.तर मुस्लिम व बोहरा समाजबांधवांनी देखील आ सौ वाघ यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.