अमळनेर आगरास मोठा बहुमान मिळाल्याने कामगारांमध्ये आनंद
अमळनेर-राज्यात एकमेव मान्यताप्राप्त असलेल्या महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचा 55 वा वार्षिक मेळावा दापोली जि रत्नागिरी येथे दि. 24 फेब्रुवारी रोजी पार पडून या मेळाव्यात जाहीर झालेल्या राज्य कार्यकारिणीत संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अमळनेर आगराचे एल टी पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
या मेळाव्याचे उदघाटक म्हणून माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचन्द्र पवार तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील तटकरे यांची होती.या मेळाव्यात 2019 या वर्षाची राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात प्रामुख्याने अमळनेर आगाराचे एल.टी. पाटील यांची संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी सर्वानुमते एक मुखाने निवड करण्यात आली.एल टी पाटील हे संघटनेच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी कार्यरत होते, कामगारांच्या हितासाठी सतत लढणारे हे अभ्यासू नेतृत्व असल्याने त्यांचे आता पर्यंतचे कार्य पाहून राज्य उपाध्यक्ष पदाचा मोठा बहुमान त्यांना देण्यात आला.या निवडीमुळे आगरास राज्य संघटनेत थेट प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्द झाल्याने अमळनेर आगारासह जिल्ह्यातील कर्मचारी वर्गाने आनंद व्यक्त करून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव केला.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अनिल भाईदास पाटील,मार्केट संचालक विजय प्रभाकर पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील,संभाजी लोटन पाटील,संजय पाटील,राजू फाफोरेकर,समाधान धनगर तसेच जळगाव विभागाचे अध्यक्ष सुरेश चांगरे,विभागीय सचिव योगीराज पाटील,अमळनेर आगराचे ब्रिजलाल पाटील,एस टी मोरे,बी एस वानखेडे,एन वाय सोनवणे,अमोल पाटील,तुषार साळुंखे,बी सी महाजन,गजू मराठे,सतीश पवार यासह स्थानिक पदाधिकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.तर अमलनेर आगरास मोठा बहुमान दिल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व सभासदांचे अमळनेर आगार कामगार संघटनेने आभार व्यक्त केले आहेत.