अमळनेर (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिनानिमित्त अमळनेर येथील शिवसेना कार्यालयात शहरातील व ग्रामीण भागातील ६१ ज्येष्ठ नागरिकांना टोपी, रुमाल, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक हेमंत भांडारकर होते. अमळनेर तालुका व शहरातील तालुक्यातील एस. एम. पाटील पू.साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर असताना शासनाकडून गरीब जनतेला नवनवीन योजना मिळवून दिल्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवास मोफत केला, महिलांसाठी लाडकी बहिण योजनेचे पंधराशे रुपये महिलांच्या खात्यावर जमा केले. ज्यामुळे अनेकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला, असे ते म्हणाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित माजी नगरसेवक विक्रांत पाटील, धर्मवीर अध्यात्मिक सेना समन्वय तथा ज्येष्ठ नागरिक दिलीप बहिरम यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुभाष यादव पाटील (म्हसले) उपतालुका प्रमुख सुरेश आसाराम पाटील (जानवे), माजी सरपंच महेश पाटील (नगाव), अमित ललवाणी, दिपक नंदू पाटील ग्रा.प.सदस्य सुंदरपट्टी, ज्येष्ठ शिवसैनिक बी व्हीं पाटील (रणाईचे), तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक मंगलग्रह संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, आर. व्ही. पाटील, माथाडी नेते भगवानराव पाटील माथाडी, माजी नगरसेवक हिम्मतराव देसले, रामदास बडगुजर, सुरेश न्हावी, श्रावण चौधरी, शालिक पाटील, बळिराम पाटील, दिलीप जैन, राजेंद्र पाटील, उमाकांत नाईक, भगवान पाटील, सुरेश बाविस्कर, अरुण पाटील, मधुकर पाटील, हभप केशव महाराज, अर्जुन पाटील, अरुण पाटील आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन – सुरेश अर्जुन पाटील (अमळनेर तालुका शिवसेना विधान सभा क्षेत्र प्रमुख), संजय कौतिक पाटील (भूत बापू) (अमळनेर शिवसेना शहरप्रमुख) यांनी केले होते. सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र पिंगळे यांनी केले. आभार सुरेश अर्जुन पाटील यांनी मानले.