अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथे मसंत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशन तर्फे संपूर्ण भारत देशातिल 350 शहरातील तब्बल 765 सरकारी हॉस्पिटल परिसरात मेगा स्वछता अभियान व वृक्ष रोपनाचे आयोजन करण्यात आले आहे .याच अनुशंगाने 23 फेब्रूवारी रोजी अमलनेर शहरातील नगरपालिकेचे शिवाजी उदयान ह्या परिसराची सम्पूर्ण स्वछता करत निरंकारी स्वयं सेवकानी जमा केलेला कचरा नागर्परिषदेच्या कचरा जमा करणाऱ्या वाहानात टाकत स्वच्छ भारत सुंदर भारत चा नारा दिला. तत्कालीन सद्गुरु हरदेवसिंह जी महाराज यांच्या 65 व्या जन्म दीना निमित्त संत निरंकारी मिशन 23 फेब्रूवारी हा दिवस गुरुपूजा दिवस म्हणून साजरा करत असतो त्या अनुशंगाने निरंकारी स्वयं सेवक त्या दिवशी विविध ठिकाणी स्वछता अभियान राबवून वृक्ष रोपण देखील करतात.
ह्या कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी अमळनेर येथील मुखी श्रीचंद निरंकारी हे होते तसेच सेवादल इंचार्च कैलास डिंगराई सह गणेश जाधव, जितेंद्र डिंगराई, पप्पू माधवानी, सूरज पंजवानी, आर डी महाजन, वीरेंद्र केसरी, घनशाम पंजवानी, राकेश पाटिल, पंजवानी, शशिकांत पाटिल, लक्ष डिंगराई, निखिल आणि प्रिंस केसरी,अमित निरंकारी सुशीलाजी निरंकारी,रेश्मा निरंकारी, सोनम निरंकारी,, सुनीता जाधव, संगीता केसरी, उज्वला महाजन,जागृति पाटिल, वैशाली बोरसे, कोमल बोरसे, तेजस्वी पाटिल, राखी बतेजा, पायल पंजवानी, पूनम सिंधी,असे अनेक निरंकारी स्वयं सेवकानी कष्ट घेतले.