अमळनेर (प्रतिनिधी )प्रबोधन संघर्ष व रचनात्मक लढाई लढणारे या सर्वांना बळ देणाऱ्या रमाई यांच्या जयंती निमित्त अमळनेर तालुका पोस्ट आॅफीस येथील कर्मचाऱ्यांना दर्शना पवार लिखित लढणाऱ्यांचे बळ रमाई हे पुस्तक भेट देण्यात आले.
पोस्ट आॅफीस मधील कर्मचारी यांनी पुस्तक वाचून रमाई समजून घेऊ असे आश्वासन दिले. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या जागेला भेट द्या. लोकश्रमातून उभ्या राहणाऱ्या या प्रोजेक्टला शक्य असलेली मदत करा, असे आवाहन केले. त्याप्रसंगी पोस्ट आॅफीसचे सर्व कर्मचारी, पोस्टमन व दर्शना पवार उपस्थित होते.