झोपेचं सोंग घेणाऱ्या शासनाला जाग यावी म्हणून पाडळसे धरण समितीतर्फे “घंटानाद” आंदोलन

साखळी उपोषण आंदोलनात “घंटानाद”करतांना आंदोलन कर्ते

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर पाडळसे धरण जन आंदोलन समितीतर्फे आंदोलनाला पाच दिवस झाले तरी शासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचे पाहून शासनाला जाग यावी म्हणून आज आंदोलनकर्त्यांनी दिवसभर ‘घंटानाद’आंदोलन केले.आंदोलन मंडपास आग लावण्याच्या वृत्ताने संतापलेले युवक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
पाडळसे धरण जनआंदोलन समितीचा संघर्ष दिवसेंदिवस तिव्र होत असून आंदोलनास सर्वच स्तरातून पाठींबा मिळत आहे. साखळी उपोषणाच्या पाचव्या दिवशी ही शासनाला धरणाचे प्रश्नाचे वास्तव व गांभीर्य लक्षात येत नाही म्हणून आज उपस्थित विविध मंडळानी तिव्र रोष व्यक्त केला. शासनकर्त्याना जाग यावी म्हणून आंदोलन स्थळी आज घंटा बांधण्यात आला.दिवसभर आंदोलनास पाठिंबा देणाऱ्यांनी घंटा वाजवून साखळी उपोषणासह “घंटा नाद” आंदोलनहि चालविले. तर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन तिव्र करण्याचा निर्धार पाडळसे धरण जनआंदोलन संघर्ष समितीने जाहिर केला आहे.

नाभिक मंडळ पाठींबा देतांना

आंदोलनास गाडी भेट देणारे निंबा दला चौधरी यांनी रोख निधी देत मदत जाहीर केली. आज अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटिल,कवि हिरामण कंखरे,अमळनेर युवा मंचाचे युवक कार्यकर्ते ,अमळनेर समस्त नाभिक पंचमंडळ चे पदाधिकारी, श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटीचे संचालक,नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, अमळनेर,त्रिवेणी महिला मंडळ,पिपळे येथिल महिला मंडळ तसेच रक्तदाते मंडळासह, अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात उपस्थिती दिली . महिला कार्यकर्त्या सौ.प्रतिभा पाटिल, सौ.विद्या शहा,सौ. मिनाक्षी देशमुख, सौ.अर्चना शहा, सौ.अलका शाह,सौ.सरला शिंपी, सौ.पुष्पा चौधरी, सौ.वैशाली राणे आदिंसह ऍड.तिलोत्तमा पाटिल, मनोज शिंगाने, तुषार सोनार, परेश उदेवाल,पंकज भावसार,हितेश पाटिल,करण नेरकर,प्रथमेश भोसले,कुणाल साळी, निखिल चव्हाण, सागर विसपुते,योगेंद्र बाविस्कर,राहुल पाटिल, प्रकाश शेलकर,पारस धाप,लोकेश महाजन,सनी गायकवाड, शौर्य गोत्राळ,मुशाहीद शेख आदिंसह शेकडो युवक सहभागी झालेत.

आंदोलनात सहभागी राजकीय कार्यकर्ते

तर आज मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल यांनी धरणाची माहिती असलेले कागदपत्रं अभ्यासासाठी कार्यकर्त्यांना पुरविलीत. यावेळी अर्बन बँक संचालक भरत ललवाणी,मा.प.स.सभापती भोजमल पाटिल, खोकरपाट चे भरत पाटिल उपस्थित होते.
कामगार नेते रामभाऊ संदानशिव यांनीही यापूर्वी आंदोलनास उपस्थिती देऊन पाठींबा दिला आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटिल, मुख्तार खाटीक,संजय पाटिल हे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह हजर राहिले.चिमनपुरी पिंपळे येथिल श्री.गुरुदेव दत्त महिला मंडळाच्या सौ.शिला पाटिल,सौ.रेखा पाटिल, सौ.स्वाती पाटिल, सौ.चबेलाबाई पाटिल, सौ.अशाबाई पाटिल, भागवत गुरुजी आदींनी उपोषण केले. तर चोपडा, पारोळा तालुक्यातील गावांसह अमळनेर तालुक्यातील नंदगाव, सानेनगर, बोरगाव, खवशी, नगाव,गडखांब, जानवे, वाघोदे, कुर्हे खु, झाडी, निसर्दी, जवखेडे, शिरूड, चोपडाई भरवस, रत्नापिंप्री, एकलहरे, हेडावे, टाकरखेडे,खोकरपाट, पिपळी, नोभोरा,अंबारे तसेच रत्नापिप्री, वेले चोपडा येथिल ग्रामस्थांनीही मोठया संख्येने साखळी उपोषण आंदोलनात उपस्थिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *