मांजर्डी व नगांव येथे विविध विकास कांमाचे थाटात भूमिपूजन

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील ग्रामिण भागात आजही काही समस्या असताना त्या पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करीत असून तळा गाळापर्यंत जंनसुविधा पोहोचविणे हेच आपले ध्येय असल्याची भावना आ सौ स्मिता वाघ यांनी मांजर्डी व नगाव येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केली.
तालुक्यातील मांजर्डी येथे 25/15 लेखाशीर्षा अंतर्गत श्रीकृष्ण मंदिराजवळ भव्य सभा मंडप तसेच नगांव येथे शिवस्मारक व रस्ता क्रॉक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा आ. स्मिता वाघ यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.
मांजर्डी येथे श्रीकृष्ण मंदिराजवळ सभा मंडप असावे अशी मागणी ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून होती ती पूर्णत्वास आल्याने ग्रामस्थानी आ सौ वाघ यांचे आभार व्यक्त केले. नगाव येथेही शिवस्मारकासह महत्वपूर्ण रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावल्याने ग्रामस्थानी आभार मानले.
यावेळी पंचायत समितीचे सदस्य निवृत्ती बागुल,विनोद जाधव ,दिलीप पाटील,मधुकर पाटील,प्रकाश पाटील,जगदीश पाटील,महेश पाटील, हितेश पाटील,भूषण पाटील,तुषार पाटील,किरन पाटील,अविनाश पाटील,दीपक पाटील,हितेश जैन यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते