अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित, पर्ल इंटरनॅशनल स्कूल व औद्योगिक प्रशिक्षण संस्था(ITI) साठी मैदान समपातळीत करण्यासाठी ११,८५०००/- रु. खर्चास संस्थेने मंजुरी दिली असून सदर कामासाठी आजपासून प्रारंभ करण्यात आला. या मध्ये २ एकर जागा समपातळी केली जाणार आहे.मैदानावर २०० मीटर ट्रॅक, देशी-विदेशी खेळाची मैदाने तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य,मानसिकता प्रबळ होणे, स्पर्धेत भाग घेणे, विविध खेळात नैपुण्य मिळवणे,सांघिक भावना निर्माण करणे,आरोग्यदायी विद्यार्थी व नागरिक तयार करणे यासाठी संस्थेने पर्ल इंटरनॅशनल व ITI च्या विद्यार्थ्यांसाठी खेळात प्रगती व देशाचा सुदृढ नागरिक बनवण्यासाठी सदर मैदान समपातळीत करण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. याप्रसंगी पर्ल इंटरनॅशनल स्कूल च्या प्राचार्या सौ.ज्योती सुहागीर यांनी यासाठी लागणारे यंत्रसामुग्री, ट्रॅक्टर चे विधिव्रत पूजन केले. यावेळी संस्थेचे चेअरमन प्रा.चंद्रकांत भदाणे, सेक्रेटरी सौ.गायत्री भदाणे, ITI चे प्राचार्य श्री.संदीप भोई तसेच पर्ल इंटरनॅशनल स्कूलचे सर्व शिक्षक-कर्मचारीवृंद विद्यार्थी तसेच ITI चे कर्मचारी उपस्थित होते. अश्या या चांगल्या उपक्रमाचे पालक व विद्यार्थी व नागरिकांनी तसेच अनेक मान्यवरांनी या कामाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.