अमळनेर ( प्रतिनिधि ) शहरातील सुन्नी दावते इस्लामी च्या वतीने दोन दिवसीय सुन्नी इज्तेमाचा आयोजन दिनांक २३ व २४ फरवरी २०१९ रोजी विप्रो रोड जापान जीन येथील इज्तेमा नगरात मुंबई येथील मौलना शाकिर अली नुरी यांच्या मुख्य उपस्थित होणार आहे
सुन्नी दावते इस्लामी शाखा अमळनेर च्या वतीने आयोजित सुन्नी इज्तेमा २३ फरवरी रोजी महिलांसाठी तर २४ फरवरी रोजी पुरुषांसाठी होणार आहे महिलांची स्पेशल व्यवस्था करण्यात आली आहे या सुन्नी इज्तेमात हजारोंच्या संख्येने नासिक मुंबई भिवंडी सह संपूर्ण खान्देश व मध्य प्रदेश गुजरात राज्यातील विविध भागातून भाविक येणार आहे या इज्तेमा साठी जे मुलभूत सुविधा आहे त्याचे काम पूर्णपणे झालेले आहेत इज्तेमागृहात शौचालय ५० वजुखाने साठी १५० नळ व पाण्याच्या हाऊद अंदाजे २० हजार लिटरचे आणि ५० दुकानाच्या स्टॉल चिकित्सालय पी आर ओ रूम प्रशासन रूम सह आदि व्यवस्था पूर्णपणे झालेली आहेत एकुण आठ एकर च्या पटांगणात इज्तेमाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे या इज्तेमात प्रवचनाला सुन्नी दावते इस्लामी शाखाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख मौलना रोहेफ रजा खान्देश प्रमुख मौलना अमिनुल कादरी कारी रिजवान साहाब आणि उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात सह महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून हाफिज कारी आलीम मौलना आणि महिलांना प्रवचना साठी महिला आलेमा मुबलीका ही येथील सुन्नी दावते इस्लामी चे अंतरराष्ट्रीय प्रमुख मौलना अल हाज शाकिर अली नुरी यांच्या मुख्य उपस्थित दुवा ( प्रार्थना ) होणार आहे इज्तेमा साठी न पा मार्फत स्वच्छता सह आदि सुविधा पुरविण्यात येणार आहे तसेच शहरातील विविध सेवा भावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते आणि सुन्नी दावते इस्लामी चे मुबलक रात्र दिवस परिश्रम घेत आहेत