निम येथील कपिलेश्वर मंदिर भक्तनिवास इमारतीसाठी 2 कोटी निधीस मंजूरीं-आ शिरीष चौधरी

शिव भक्तांमध्ये आनंद,धार्मिक व निसर्गरम्य वातावरणात निवासाची होणार सोय,कपिलेश्वर देवस्थानास नवे रूप देण्याचा आमदारांचा संकल्प

अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील निम येथील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कपिलेश्वर मंदिराच्या भक्तनिवास इमारतीसाठी 2 कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली.या उल्लेखनीय विकासकामाबद्दल मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस,व राज्याचे पर्यटन मंत्री ना जयकुमार रावल यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.या विकासकामामुळे भक्तांना मंदिरस्थळी निवासाची सोय उपलद्ध होणार आहे.
तापी,पांझरा व अनेर नदीच्या त्रिवेणी संगमावर निसर्गरम्य वातावरणात कपिलेश्वर देवस्थान असून याठिकाणी भव्य व पुरातन हेमाडपंथी शिव मंदिराचे निर्माण झाले आहे,राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी अनेक वर्षांपूर्वी याची निर्मिती केली असून हे देवस्थान जळगाव ,धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सुपरिचित असून असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे,महाशिवरात्रीला याठिकाणी मोठी यात्राही भरत असते ,याव्यतिरिक्त वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरु असतात,तसेच तपस्वी साधू संतांचे देखील याठिकानी वास्तव्य असते,अशा विविध कारणांनी संपन्न असलेल्या मंदिरात भाविकांच्या निवासासाठी भक्त निवास असावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होती,यासाठी कपिलेश्वर देवस्थान समितीने आ शिरीषदादा चौधरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
अखेर आ शिरीष चौधरी यांनी या भावनिक प्रश्नात हात घालून मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री ना जयकुमार रावल यांच्याकडे सतत पाठपुरावा करून या देवस्थानचे महत्व विशद केले,अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन पर्यटन विकास विभागाने भक्त निवासासाठी 2 कोटी निधीस मंजुरी दिली आहे,या निधीतून भव्य असे भक्त निवासाचे निर्माण होणार असून यात भक्तांसाठी आधुनिक सोई सुविधा उपलब्द होणार आहेत,याव्यतिरिक्त धार्मिक तिर्थक्षेत्राप्रमाणे या पावित्र ठिकाणी आवश्यक त्या आधुनिक सोई सुविधा उपलब्द केल्या जातील असा मानस आ शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *