धुळे जिल्ह्यात ड्राय डे मात्र जळगांव जिल्ह्यात का नाही जनतेचा सवाल…
अमळनेर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत , एक आदर्श राजा , सुराज्य आणि स्वराज्य निर्माण करणाऱ्या महापुरुषांच्या जयंतीला अमळनेर शहरात बिनधास्त पणे दारू विकली जात होती ही प्रशासनच्या दृष्टीने लज्जस्पद बाब आहे
राजांचा आदर्श तरुणांनी घ्यावा म्हणून धडे दिले जातात , डोस पाजले जातात आणि मिरवणुकीत एकही तरुण दारू पिऊन नाचू नये म्हणून सर्व दारू दुकाने बंद असावीत अशी अपेक्षा सामान्य जनतेची होती शासनाने म्हणजे जिल्हाधिकारिंनी देखील ड्राय डे जाहीर करावयास पाहिजे होता. परंतु जळगाव जिल्ह्यात ड्राय डे जाहीर झाला नसल्याने सर्रासपणे बिअर बार सह दारूचा गुत्ता सुरू होता आणि युवकांनी दारूचा आस्वाद घेऊन धिंगाणा घातला जवळच्या धुळे जिल्ह्यात ड्राय डे जाहीर झाला आणि जळगाव जिल्ह्यात होऊ नये याची लाज वाटते की खरोखर विसर पडला. जिल्हाधिकारिंना याचे भान नसावे का शिवछत्रपती जळगाव जिल्ह्याचे नव्हते का असा सवाल विचारला जात आहे.इतर महापुरुषांच्या जयंती तथा गणेशोत्सव काळात ड्राय डे जाहीर करून मद्य प्राशन करणाऱ्यांना आळा घातला जातो तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला का नाही अनेक तरुण बिघडण्यास शासनच जबाबदार म्हणावे लागेल ‘अंधार खूप झाला आता दिवा पाहिजे’ ‘पुन्हा एकदा महाराष्ट्राला जीजाऊ चा शिवा पाहिजे’ अशी मागणी योग्य होईल का अधिकारीच तरुणांच्या जीवनात दारू दुकाने सुरू ठेवून अंधार करीत आहेत.