पाडळसरे धरण हे शासनाच्या नाकर्तेपणामुळे दुर्लक्षिलेगेल्याने उपोषण आंदोलनास शिवजयंतीला सुरवात

भाजपचे उदय वाघांनी जामनेरात पाडळसरे धरण संघर्ष समितीची उडवली टिंगलं ; होय आम्ही जलसंपदामंत्री कडे भिक मागण्यासाठी आलोय- सुभाष आण्णा चौधरी

अमळनेर ( प्रतिनिधी)अमळनेर येथिल पाडळसरे धरण संघर्ष समितीच्यावतीने अमळनेर तालुक्यासह बाजूच्या तालुक्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या पाडळसरे धरणाच्या पूर्ती साठी आज नाट्यगृह येथिल छ. शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यास वंदन करून शिवघोषासह धरणपूर्ती झालीच पाहीजे या घोषणा देत निघालेल्या फेरीतून आंदोलकांनी तहसिल कार्यालयासमोर येत उपोषण आंदोलनास शिवजयंतीला सुरवात केली.

शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करतांना आंदोलनकर्ते

प्रदीर्घकाळापासून प्रलंबित असलेले तापी नदीवरील पाडळसरे धरण हे शासनाच्या नाकर्तेपणामुळे दुर्लक्षिलेगेल्याने अमळनेरसह आजूबाजूच्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्यासह शेतजमिन सिंचनाचा अनुशेष निर्माण झाला आहे.दिवसेंदिवस वाढणारी धरणाची किंमत आणि अमळनेरकरांचा खदखदणारा असंतोष प्रदीर्घ काळ सुरू राहणाऱ्या उपोषण आंदोलनातून व्यक्त होत आहे.सकाळी १०.३०ला नाट्यगृह येथिल छ.शिवाजी महाराज्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्प अर्पण करित वंदन केले.शिव घोषासह , पाडळसरे धरण झालेच पाहिजे च्या घोषणा देत आंदोलनकर्ते नाट्यगृह ,मंगलमूर्ती पतपेढी, प्रबुद्ध कॉलनी,कोर्ट रोड, विश्रामगृह, बळिराजा स्मारक मार्गे तहसिल काचेरीसमोरील उपोषण स्थळी पोहोचले. याप्रसंगी तापी नदीच्या पाण्याचे जलपूजन करून उपोषण आंदोलनास सुरवात करण्यात आली.

मा.उपनगराध्यक्ष चंदुसिंग परदेशी, शरद पाटिल, मेहरगांव, संतोष पाटील,संभाजी ब्रिगेडचे जयवंत शिसोदे, अख्तर सैय्यद,चंद्रकांतआप्पा पाटील आदि कार्यकर्ते सहभागी झाले.

उपोषण आंदोलनात पाडळसरे धरण संघर्ष समिती चे सुभाष चौधरी, शिवाजीराव पाटील,एस.एम. पाटिल. योगेश पाटील,रामराव पवार,डी.एम.पाटील,एन. के.पाटील,रविंद्र पाटील, अजयसिंग पाटिल, सुनिल पाटिल, सतिश काटे, आर.व्ही.पाटील,सुनिल पवार,देविदास देसले, रणजित शिंदे,महेश पाटिल,पुरुषोत्तम शेटे,आर.बी.पाटील,
दिलीप पाटील,मेहमूद बागवान, रियाजुद्दीन आदि समितीच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक,युवक, सामाजिक व राजकीय कार्यकर्तेही सहभागी झालेत.

आंदोलनकर्त्यांसह सहभागी सामाजिक व राजकीय पदाधिकारी
तापी नदीच्या पाण्याचे जलपूजन करतांना आंदोलनकर्ते

आंदोलनास मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, काँगेस चे प्रदेश सरचिटणीस सौ.ललीताताई पाटील, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील,जिल्हा बँक संचालिका सौ.तिलोत्तमाताई पाटील, सौ.जळगांव चे महापौर किशोर पाटील, चोपडा येथिल सामजिक व राजकिय कार्यकर्त्या सौ.माधुरी किशोर पाटिल,शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष एस.बी.पाटील आदिंसह शैक्षणिक संस्थाचालक व.ता.पाटील,डी. डी.पाटील, प्रा.अशोक पवार,प्रा.गणेश पवार, निवृत्त प्रांताधिकारी एच.टी.माळी, वकील संघाचे अध्यक्ष किरण बागुल, मारवड सरपंच उमेश पाटील,राजेंद्र निकम,ओम साई सेवा समिती चे वतीने संजय चौधरी,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजीराव दौलत पाटील,जिल्हा बँकेचे मा.व्हाईस चेअरमन नानागीर गोसावी,कृ. उ.बा संचालक सुरेश पिरण पाटील,जेष्ठ नागरिक सानेगुरुजी मंडळचे व ठेवीदार संघाचे उमाकांत नाईक,अमळनेर महिला मंच मंडळाचे सर्व महिला पदाधिकारी,युथ सेवा फाउंडेशनचे रियाजुद्दीन शेख व सहकारी अजबराव पाटील,व्यापारी युनियनचे चंद्रकांत साळी,रमेश पाटील, तळवाडे,ऍड. तिलोत्तमा पाटील,डॉ.प्रशांत शिंदे,सौ.सुलोचना पाटील, मा.उपनगराध्यक्ष चंदुसिंग परदेशी, शरद पाटिल, मेहरगांव, संतोष पाटील,संभाजी ब्रिगेडचे जयवंत शिसोदे, अख्तर सैय्यद,चंद्रकांतआप्पा पाटील आदिंसह वेगवेगळ्या गावातून दिवसभर ग्रामस्थ शेतकरी व शहरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने आंदोलनात दिवसभर सहभागी होत राहिले.

भाजपचे उदय वाघांनी जामनेरात पाडळसरे धरण संघर्ष समितीची उडवली टिंगलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *