महाराष्ट्राचे आराद्य दैवत छत्रपती शिवरायांची जयंती कोणताही बडेजावपणा आणून अभिवादन व शहिद जवानांना नमन
अमळनेर(प्रतिनिधी) – काश्मीर येथे पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ला झाल्याने या हल्ल्यात देशाचे ४४ जवान शहीद झाले असून संपूर्ण देश दुःख सागरात बुडाला आहे,अशा दुःखद प्रसंगी रयतेचा राजा व महाराष्ट्राचे आराद्य दैवत छत्रपती शिवरायांची जयंती कोणताही बडेजावपणा आणून साजरी न करता साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली राजाला अभिवादन व शहिद जवानांना नमन करून राजकारण विरहीत साजरी करण्यात आली. या हल्ल्याच्या आधीच राजकारण आणि आयोजकांचे फोटो विरहीत फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा असलेले फलक पालिकेतर्फे लावण्यात आले होते.यात चौकाचौकात पथनाट्य सादर करण्यात आले.
काश्मीर येथे पुलवामा जिल्ह्यात आंतकवादी हल्ला होऊन यात महाराष्ट्रातील तीन जवानांसह ४४ जवान शहीद झाले,यामुळे संपूर्ण देश दुःख सागरात बुडून अघोषित सात दिवसांचा दुखवटा सर्वत्र पाळला जात आहे,ज्या कुटुंबातील जवान शहीद झाले त्या कुटुंबावर तर मोठा आघातच झाला आहे.अशा दुःखद प्रसंगी छत्रपती शिवरायांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. त्यासाठी पाचपावली देवी पासून सार्वत्रिक मिरवणूक काढण्यात आली होती त्यात देशभक्तीपर शिवरायांवर गीते गायन करण्यात येणार आहेत ही मिरवणूक पवन चौक, मनोकामना साडी सेंटर, बसस्थानक, जिल्हापरिषद विश्रामगृह, कचेरी रोड, मंगलमूर्ती मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ विसर्जन करण्यात आले यात सर्व जातीधर्माचे नागरिक एकत्र येणार असून सर्व राजकारणी पण याचठिकाणी एकत्र आले होते त्यात मराठा महासंघाचे मनोहर पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील, हिरा उद्योग समूहाचे डॉ रवींद्र चौधरी, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील यांच्यासह काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ आदींसह विविध पक्षाचे ही मिरवणूक सार्वत्रिक व पक्ष विरहित होती.मिरवणुक विसर्जन वेळी श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.