अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे कुळवाडीभूषण,संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. सुरुवातीला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका सौ.सविता महाजन यांनी केले. यावेळी व्यासपीठावर शाळेचे चेअरमन मा.चंद्रकांत भदाणे, प्राचार्या सौ.ज्योती सुहागीर व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. चेअरमन व प्राचार्या सौ.ज्योती सुहागीर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर प्राचार्या सौ.सुहागीर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा विद्यार्थ्यांना सांगितली. मूठभर मावळे हाताशी धरून भल्या-भल्या शत्रूंचा पराभव करत कशी स्वराज्याची स्थापना केली आपल्या भाषणात त्यांनी सांगितले. इ.४ थी ते ६ वी च्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची भाषणे दिली व त्याच प्रमाणे त्यांच्या पराक्रमावर आधारित समूह गीतही सादर केले. यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज की जय !” या जयघोषाने शाळा दुमदुमत होती काही विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा प्रदान केली होती. विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ही दाखवण्यात आला. शेवटी आभार प्रदर्शन शाळेच्या उपशिक्षिका सौ.मेघा चव्हाण यांनी केले. यावेळी प्राचार्या समवेत सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.