ग्राहक पंचायतीच्या जिल्हा अभ्यास वर्गाचे आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांची केवळ ग्राहक हिताबरोबर कुटुंब व्यवस्था देखील सांभाळायची आहे. समाजातील विविध वर्गांची क्रॉस चेकिंग देखील करून समस्या सोडवणूक करण्याचे काम ग्राहक पंचायतीचे आहे असे मत अ.भा.ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र शासनातील राज्य अन्न आयोग व ग्राहक कल्याण सल्लागार समिती अध्यक्ष (मंत्रिस्तरीय) अरुण देशपांडे ग्राहक पंचायतीच्या जिल्हा अभ्यास वर्गाचे आयोजन प्रसंगी केले.
अ.भा.ग्राहक पंचायत जिल्हा जळगांव यांच्या माध्यमातून अभ्यास वर्ग रविवारी जी एस हायस्कुल (आय.एम.ए. हॉल) येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक भालेराव यांनी केले. तर प्रास्ताविक राजेंद्र सुतार यांनी केले.
त्यावेळी अभ्यास वर्गाचे उदघाटन अ.भा.ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र शासनातील राज्य अन्न आयोग व ग्राहक कल्याण सल्लागार समिती अध्यक्ष (मंत्रिस्तरीय) अरुण देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायतीचे पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री जयप्रकाश पाटील,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर, मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष धनंजय गायकवाड, देवगिरी प्रांत सचिव ओंकार जोशी,राज्य ग्राहक संरक्षण परिषद सदस्य तुषार झेंडे पाटील,ग्राहक राजा मासिकाचे कार्यकारी संपादक दिलीप फडके, अहमदनगर जिल्हा संघटक अतुल कुऱ्हाडे आदींनी मार्गदर्शन केले.
ग्राहकांच्या समस्या, होणारी फसवणूक,त्यावरील उपाय, ग्राहक मंच कार्यप्रणाली,ग्राहक संरक्षण कायदा-१९८६,माहिती अधिकार कायद्याचा योग्य वापर, ग्राहक पंचायतीत काम करण्यासाठी सामील होण्याचे निकष,आदी विषयांवर विचार मंथन करण्यात आले. तसेच विविध विषयांवर चर्चा देखील करण्यात आली.
या एकदिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन अमळनेर तालुका ग्राहक पंचायतीने केलेले होते. जिल्ह्यातील सुजान आणि जागरूक ग्राहक मोठ्या संख्येने या अभ्यास वर्गाला उपस्थित होते.
यावेळी आयोजक मकसूद बोहरी,राजेंद्र सुतार,जयंतीलाल वानखेडे, विजय शुक्ल, योगेश पाने, विजय पारख,अरविंद मुठे, महेश कोठावदे, एड भारती अग्रवाल, वनश्री अमृतकर, उर्मिला अग्रवाल, सुधा शिंदे, पद्मजा पाटील,सुनील वाघ, खादीर सादिक, बापू चौधरी यांनी अतिशय उत्तम असे आयोजन केलेले होते. जिल्हाभरातील सर्व व शहरातील ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष सदस्य, पदाधिकारी,व्यापारी, नागरिक यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी बोलताना अरुण देशपांडे म्हणाले की – सरकार महाराष्ट्रात 7 कोटी लोकांना 2 रुपये किलो आणि 3 रुपये धान्य घेतात त्यामुळे खरे तर भिकारी आणि कोणी उपाशी राहायला नको यासाठी भिकारी दिसला तर त्याला प्रथम आधार कार्ड काढून द्या. त्यानंतर त्याला तहसिलदारकडे जाऊन पिवळी शिधापत्रिका तयार करून द्या आणि अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून द्या. कार्यकर्ता कसा असावा आणि कसा असला पाहिजे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. सध्या वाहिन्यांवर सामाजिक स्वास्थ बिघडविणार्या सुरू असलेल्या मालिकांबाबत देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली.