
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरातील श्री विश्वकर्मा मंडळातर्फे यंदा पुलावामा हल्ल्याच्या निषेधार्थ श्री विश्वकर्मा जयंती साधेपणाने व रक्तदानाच्या सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न झाली.
येथील विश्वकर्मा मंडळ व सुतार समाज आयोजित विश्वकर्मा जयंती येथील ढेकूरस्त्यावरील विश्वकर्मा मंदिराच्या प्रांगणात साजरी केली , यावेळी प्रारंभी पुलावामा येथील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला.श्री विश्वकर्मा भगवान यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले समाजातील अतिशय सुनियोजित, शिस्तबद्द पद्धतीने आनंदी व प्रसन्नमय वातावरणात उत्साहाने संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक डी आर सूर्यवंशी हे होते त्यानंतर आयोजित मिरवणूक कार्यक्रम रद्द करण्यात येऊन केवळ रक्तदान करत सामाजिक उपक्रम केला. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येथील विश्वकर्मा मंडळाचे अध्यक्ष ईश्वर खैरनार उपाध्यक्ष बाबुराव खैरनार खजिनदार दिलीप मिस्तरी ज्ञानेश्वर मोरे, सुभाष देवरे, डॉ दुल्लभ बोरसे, काशिनाथ खैरनार, चिंतामण बोरसे, चिंधु सूर्यवंशी, शिवाजी खैरनार, विजय सुतार, दिलीप जाधव, वसंत सूर्यवंशी, गोकुळ लोहार, प्रशांत लोहार, रमेश खैरनार, राजधर निकम, संजय मोरे, कैलास मोरे, ज्ञानेश्वर मोरे, सुभाष देवरे, अरुण बोरसे, अमित जगताप, अनंत सूर्यवंशी, गंगाधर पांचाळ, प्रकाश बोरसे, विकास हिरे आदी नवयुवकांनी देखील या कार्यक्रमात सहभाग नोंदवला