शहीद वीर जवानांना दिली सामूहिक आदरांजली

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व घटकांनी एकत्रित येत जम्मू काश्मीर मधील पुलवामा मध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करून या हल्ल्यात शहिद झालेल्या सर्व भारत मातेच्या सुपुत्रांना सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.
आतंकवाद्यांनी बॉम्ब हल्ला केल्यामुळे देशाचे 44 सैनिक शहीद झाले, अचानक घडलेल्या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,यामुळे जनतेने संयम राखून देशपातळीवर जो निर्णय होईल त्याचे समर्थन करावे अशी भावना बाजार समितीचे सभापती उदय वाघ व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.यावेळी मार्केट यार्ड अडत असोसिएशन चे सर्व सदस्य,व्यापारी बांधव,बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी,हमाल व मापाडी बांधव,शेतकरी बांधव,व्यापारी संकुलातील व्यावसायिक, तसेच असंख्य शेतकरी बांधव व सामान्य नागरिक उपस्थित होते.उपस्थित सर्वांनी शाहीदाना सामूहिक आदरांजली अर्पण केली.