आनोरे व मंगरूळ येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील ग्रामिण भाग सर्वसुविधा युक्त व्हावा हाच आपला प्रयत्न असून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याची भावना आ सौ स्मिता वाघ यांनी तालुक्यातील आनोरे व मंगरुळ येथे विविध विकास कांमाचे भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केली.
आ स्मिता वाघ यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मंगरूळ येथे स्मशानभूमित पेव्हर ब्लॉक तसेच क्रॉक्रीटीकरण तसेच आनोरे येथे 25/15 लेखाशीर्षा अंतर्गत समाजिक सभागृह इत्यादी विकास कांमाचा भूमिपूजन सोहळा आ वाघ यांच्या हस्ते पार पडला.
तालुक्यातील मंगरुळ हे मोठ्या लोकवस्तीचे गांव असताना गांवातील स्मशानभूमिची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना अंत्यविधिच्या वेळी अडचणीना सामोरे जावे लागत होते, तसेच आनोरे येथे सामाजिक सभागृह बांधकामाची मागणी स्थानिक नागरिकांनी आ वाघ यांचे कडे केली होती,नागरिकांची मागणी लक्ष्यात घेता आ वाघ यांनी तातडीने सदर कांमासाठी निधि मंजूर करून आणला,यामुळे ग्रामस्थानी त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती वजाबाई भील,माजी जिल्हा परिषद सदस्य व्ही आर पाटिल,संदीप पाटील,श्याम आहिरे,डॉ दीपक पाटील,मंगरूळ सरपंच हर्षदा पाटील ,आनोरे येथील नरेंद्र पाटील, जिजाबराव पाटील,श्रीनिवास मोरे,किशोर पाटील ,राहुल पाटील,यांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्य व गांवातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.