अमळनेर (प्रतिनिधी) पंचायत समितीतर्फे मतदान जनजागृती मॅरेथॉनमध्ये लाडके भाऊ, शिक्षक, शिक्षिकांसह विद्यार्थी देखील धावले. यात नॅशनल उर्दू हायस्कूलचा माजिद शेख कामिल कुरेशी हा प्रथम आला आहे.
एन. आर. पाटील यांनी उपस्थित शिक्षक, शिक्षिका, लाडके भाऊ, विद्यार्थ्यांना मतदान विषयी महत्व पटवून दिले. तहसील कार्यालय ते ढेकू रोड पर्यंत मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यावेळी नोडल अधिकारी रवींद्र पाटील, केंद्रप्रमुख अशोक सोनवणे, उपमुख्याध्यापक संजय सोनवणे, तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ, क्रीडा संघटनेचे कार्यध्यक्ष संजय पाटील, किशोर पाटील, देवेंद्र पाटील, उत्तरा पाटील , कल्पना पाटील ,पूनम वाघ, स्मिता वानखेडे, निवेदिता कापडणेकर ,वेदिका चौधरी , गणेश पाटील, दिनेश पाटील ,अशोक पाटील, प्रितेश तुरणकर, के. आर. बाविस्कर उपस्थित होते.
स्पर्धेतील इतर विजेते असे
मॅरेथॉनमध्ये जाविद शकील पठाण (द्वितीय), हितेश अतुल पाटील (तृतीय), अमान खान शरीफ खान कुरेशी (चतुर्थ), तेजस हरीश चौधरी (पाचवा), मोईनखान इम्रानखान (सहावा) आला असून त्यांना गटविकास अधिकारी व प्रमुख अतिथींच्या हस्ते पदक व रोख रक्कम बक्षीस देण्यात आले.