चाळीस वर्षानंतर अमळनेरातून काँग्रेसचा आमदार निवडण्याची संधी ः अॅड. ललिता पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या अमळनेर विधानसभा मतदारसंघातून चाळीस वर्षात काँग्रेसचा आमदार निवडून आलेला नाही, यंदा मात्र ही संधी आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन अॅड. ललिता पाटील यांनी केले आहे.

यंदा महाविकास आघाडीच्या वरिष्ठांनी डॉ. शिंदे आणि अमळनेरकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एक चांगली संधी मिळाली आहे.  अमळनेर मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र चांगले संघटन असूनही गेली चाळीस वर्षे काँग्रेसचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून गेला नाही. मागे दोन वेळा ही संधी हुकली आहे. आता ह्या संधीचे सोने करायची वेळ आली असून छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडू नका, हेवेदावे बाजूला ठेवून एकदिलाने काम करून महाविकास आघाडीची ताकद दाखवून द्या, असे आवाहन ॲड. ललिता पाटील यांनी महविकास आघाडीचे सर्व नेते, कार्यकर्ते, व पदाधिकारी यांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *