विकासामुळे पारोळा तालुक्यातील ४२ गावांची मंत्री अनिल पाटलांच्या पाठीशी

अमळनेर (प्रतिनिधी) मोठ्या प्रमाणावर विकास केल्याने अमळनेर विधानसभा मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील सुमारे ४२ गावांनी मंत्री अनिल पाटील यांना भक्कम साथ दिली आहे. बोरी नदीवर बंधाऱ्यांची मालिकाच अनिल दादांनी अवतरवल्याने शेतकरी बांधवाना जलसंजीवनी मिळाली आहे.

अनेक गावातील ग्रामस्थ देखील अमळनेर मतदरसंघांचे भूमिपुत्र म्हणून अनिल दादांचा अभिमान बाळगू लागले आहे. त्यामुळे त्यांना भरघोस मतांची साथ मिळेल, असे मा.जि.प सदस्य रोहिदास पाटील, दयाराम आण्णा पाटील (शेवगे), अशोक पाटील (अंबापिंप्री), शालिक पवार (हिवरखेडा सिम), चंद्रकांत दामोदर पाटील (बहादरपुर), सुनिल काटे (कोळपिंप्री), निलेश पाटील (शिरसोदे) यांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती देतांना त्यांनी सांगितले की अमळनेर विधानसभा मतदासंघातील ही ४२ गावे म्हणजे कृषी क्रांतीचे क्षेत्रच, प्रामुख्याने हा देखील अवर्षणप्रवण भाग असताना येथील भूमिपुत्रांनी शेतीची गोडी काही सोडली नाही. अनिल दादाने ४२ गावांना कधीही अंतर दिले नाही, गाव तेथे विकास काम हेच सूत्र अवलंबविले. येथे खऱ्या अर्थाने उणीव होती ती सिंचन क्षमतेची आणि हीच सिंचन क्षमता वाढवून दाखविण्याचे काम त्यांनी केले. बोरी नदीवर पुंनगाव, भिलाली, हिवरखेडा आणि भिलाली आदी गावाजवळ साठवण बंधारे निर्माण केल्याने वाहून जाणारे पाणी अडविले जाऊन हजारों हेक्टर शेतीला पाण्यामुळे जीवदान मिळाले, अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना जिवंत होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. सुरवातीला केवळ पावसाळ्याच्या दोनचं महिने प्रवाहित दिसणारी ही नदी आता थेट जानेवारी फेब्रुवारीपर्यंत नदीत डोळ्यांना पाणी दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी कमी नक्कीच कमी झाले आहे. विकास काय असतो तो भूमिपुत्रांनेच दाखविला आहे. यामुळे अनिल दादा म्हणजेच विकासाची नांदी हे प्रत्येकाच्या लक्षात येऊ लागले असून गावोगावी पुन्हा त्यांच्याच विजयाचा सुर निघत असल्याचे महायुतीच्या कार्यकर्त्यानी म्हटले आहे.

 

१०७ कोटी खर्चून हा २५ किमी अंतराचा नवीन रस्ता

 

दुसरे मोठे काम त्यांनी मार्गी लावले ते म्हणजे जानवे, सुमठाने, जिराळी, इंधवे, बहादरपुर, महाळपुर,शेवगे आणि बोदर्डे या गावांना स्पर्शून जाणारा जानवे ते पारोळा रस्ता. तब्बल १०७ कोटी खर्चून हा २५ किमी अंतराचा नवीन रस्ता तयार होणार असून याची वर्क ऑर्डर देखील झाल्याने लवकरच याचे निर्माण होणार आहे. अनेक गावांना जोडणारा आणि दळणवळनाला मोठी गती देणारा हा रस्ता ठरणार आहे. तसेच मोंढाळे ते बहादरपुर रस्त्यांचे डांबरीकरण , शेवगे ते पुंनगाव रस्ता, किंवा गावोगावी रस्त्यांचे निर्माण, अनेक तांडा वस्ती स्वच्छ व सुंदर करणे असेल, गावोगावी मूलभूत सुविधा वाढविणे. गावोगावी नवीन पाणीपुरवठा योजना निर्माण करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे.

 

साठवण बंधारे धरून सुमारे चार कोटी निधी मंजूर

 

     गावोगावी अनिल दादांनी दिलेल्या निधीचा विचार करता अंबापिंप्री येथे साठवण बंधारे धरून सुमारे चार कोटी निधी मंजूर करून आणला असून यात काही निविदा प्रलंबित आहेत. इंधवे येथे पावणे दोन कोटी, कांकराज येथे ७२लक्ष, कोळपिप्री येथे १ कोटी ४० लक्ष या व्यतिरिक्त दीड कोटीचे दोन बंधारे देखील येथे मंजूर आहेत. तसेच खेडीढोक येथे २०लक्ष,चीख ३५ लक्ष,चीखलोद खुर्द व बुद्रुक येथे ३५ लक्ष,जिराळीत  ५० लक्ष, दगडी सब गव्हाण ६७ लक्ष, दबापिंप्री २३लक्ष, दळवेल ९० लक्ष येथेही सुमारे तीन कोटी निधी सिमेंट साठवण बंधर्यासाठी मंजूर आहेत. दहीगाव १३ लक्ष, धाबे ५३ लक्ष, नेरपाट २२ लक्ष, पिंपळकोठा १ कोटी ३३ लक्ष, पिंपळभैरव १५ लक्ष, शिरसोदे येथे अडीच कोटींच्या दोन बंधाऱ्या सह इतर कामांसाठी ५५ लक्ष,पाणी पुरवठा योजनेसाठी सव्वा कोटी, बहादरपूर ८० लक्ष या व्यतिरिक्त एक कोटींचे दोन बंधारे मंजूर आहेत. याच पद्धतीने भिलाली, बोदर्डे, भोकरबारी, भोलाने, महाळपूर, मोहाडी, रत्नापिप्री, राजवड, वंजारी, वडगाव, वसंतनगर व तांडा, शेळावे बुद्रुक व खुर्द, शेवगे बुद्रुक व खुर्द, सबगव्हण बुद्रुक व खुर्द, सुमठाणे, हिरापुर, हिवरखेडा, होळपिप्री आदी गावांना भरघोस निधी देऊन यातून बंधारे, काँक्रीटीकरण, सभामंडप, ग्रामपंचायत इमारत, स्मशान भूमी, सुशोभीकरण, डांबरीकरण, समाज मंदिर, आर ओ प्लांट, पेव्हर ब्लॉक, सामाजिक सभागृह, सरक्षन भिंत यासारखी कामे मार्गी लागून गावोगावी मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे आदिवासी भिल वस्ती असेल, मागास वर्गीय वस्ती असेल, कींवा तांडा वस्ती असेल अनिल दादाने प्रत्येकाला न्यायचं दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *