अमळनेर (प्रतिनिधी) निवडणुकीसाठी राजकीय पक्षासह प्रशासन सज्ज झाले आहे. अमळनेर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षकांनी तालुक्याच्या सीमेवरील तीन मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. तसेच मतदारांशी चर्चाही केली.
अमळनेर तालुक्यातील लांब आणि सीमेवर नदी काठावर असलेल्या कामतवाडी, गंगापुरी आणि नीम येथील मतदान केंद्राना निवडणूक निरीक्षक रंणजितसिंग यांनी भेटी दिल्या. मतदान केंद्राची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्यात. तसेच युवक मतदारांशी संवाद साधला. तुम्ही मतदान करता का ? कसे करतात? तुमच्याजवळ मतदानकार्ड आहे का? आदी प्रश्न विचारून त्यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्यासोबत प्रांजल पाटील, श्रीकांत चिखलोदकर, सेक्टर अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, बीएलओ उपस्थित होते.