अमळनेर (प्रतिनिधी) दिवााळीसह विविध सणांनिमित्त शुभेच्छापत्र आणि ग्रीटिंग पाठवले जात होते. आता मात्र सोशल मीडीया व्हास्ट झाल्याने ते दिवस इतिहास जमा झाले आहे. यामुळे शुभेच्छापत्र आणि ग्रीटिंग विक्रेत्यांनीही व्यवसायत काळानुरुप बदल केले आहेत.
शहरात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी रस्त्यावर ग्रीटिंग कार्डची दुकाने होती. तसेच जनरल स्टोअर्स मध्येही कार्ड मिळत होती. त्याला तरुणांची मोठी मागणी होती पण आता ही दुकाने इतिहास जमा झाली आहेत.
पूर्वी पोस्टमनची आतुरतेने प्रतीक्षा करण्यात येत होती. परंतु आता पोस्टमन गल्लीतून अथवा दारा समोरून गेला तरी एखादी शासकीय पत्र कोणाला आले असेल म्हणून दुर्लक्ष केले जाते. आणि आता सध्या सोशल मीडियावरच दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यामध्ये छायाचित्र आणि कार्टून काढून सांकेतिक चिन्हातून शुभेच्छा देणे सुरू आहे. त्यामुळे पत्र पाठविण्याचा विचारही येत नाही. माझ्या मामाचा पत्र हरवलं ही कुसुमाग्रजांची कविता व माझ्या मामाचे पत्र हरवले! ते कुणाला सापडले! हा लहान मुलांचा खेळ पण आता काळाच्या ओघात पडद्याआड जात इतिहास जमा झालेले आहे.
बदलत्या काळानुसार व्यवसायात बदल
सध्याच्या सोशल मीडियाचा काळ आहे. जगात कुठेही एका सेकंदात संपर्क साधता येतो. आता तात्काळ प्रतिसाद मिळत असल्याने हातात ग्रीटिंग कार्ड पाठवायची गरज काय असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. त्यामुळे आता ग्रीटिंग कार्डचा व्यवसाय बंद करून जनरल स्टोअर्स सोबतच मोबाईल रिचार्जचा व्यवसाय सुरू केला आहे.
अब्दुलकादिर कुतुबुद्दिन बूकवाला,जेनी स्टोर, अमळनेर
शुभेच्छांची केवळ औपचारिकता
स्वतः पत्र लिहून शुभेच्छा देणे ग्रीटिंग कार्ड पाठवणे यामध्ये वेगळाच आनंद असतो. पण आता सोशल मीडियातून शुभेच्छा देणे हे औपचारिकच आहे. आपल्याला आलेल्या शुभेच्छांना परत रिप्लाय देणे यात कुठलाच आनंद नसतो. पण पत्र लिहिताना मनातल्या भावना स्वतः व्यक्त केल्या जात असतात. ते सध्या दिसत नाही.
किरण सोनवणे, नागरिक, अमळनेर