अमळनेर (प्रतिनिधी) येथील बी. ए. पी. एस. स्वामीनारायण मंदिरात ७००पदार्थांचा अन्नकुट उत्सव साजरा करण्यात आला. मंदिरात भव्य अशी रांगोळी काढण्यात आली होती.
सालाबादप्रमाणे प्रमाणे विश्ववंदनीय परमपूज्य महंत स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने दिवाळीनिमित्त व नवीन वर्षाच्या सुरुवातीने बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात कौतुक व कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून भगवंताला अन्नकुट अर्पण केला. मंदिराचे संत निर्देशक पूज्य योगीस्नेह स्वामी,पूज्य अखंडमुनी स्वामी, यांनी गोवर्धन पूजा करून आरती केली. अन्नकुट उत्सवास आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. तसेच दिवाळी व अन्नकूट महोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भगवंता समोर चेतन चौधरी, आदित्य सोनवणे, जगदीश चौधरी, किशोरभाई सोनी यांनी भजन प्रसारित केले. या अन्नकुट महोत्सव यशस्वी करण्यासाठी बजरंग अग्रवाल, प्रवीणभाई सोनी, प्रशांत वाणी, श्यामकांत बागड, चंद्रकांत वाघ, दिनेश मणियार, रवींद्र चौधरी यांनी परिश्रम घेतले.