धनदाई महाविद्यालयास नॅक पुनर्मूल्यांकनात बी प्लस श्रेणी

अमळनेर (प्रतिनिधी) येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयास न्याक समितीतर्फे पुनर्मुल्यांकनात 2.54 प्लस श्रेणी प्राप्त झाली आहे. यामुळे संस्थेचे कौतुक होत आहे.

मूल्यमापन करणाऱ्या समितीने नुकतीच महाविद्यालयास भेट दिली होती. या समितीचे अध्यक्ष रिवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजयकुमार अग्रवाल हे होते तर या समितीत समन्वयक म्हणून जयपूर विद्यापीठातील डॉ. ए. व्ही. सिंघ मदनावत हे तर सदस्य म्हणून तर कर्नाटकातील डॉ शिवप्रकाश हिरेमठ हे होते. महाविद्यालयाने त्यांचे प्रथम मूल्यांकन 2016-17 या शैक्षणिक वर्षात केले होते व त्यावेळी महाविद्यालयास 2.17 गुणांसह बी श्रेणी प्राप्त झाली होती. यावेळी झालेल्या पुनर्मुल्यांकनात या गुणांमध्ये वाढ होऊन 2.54 गुणांसह B प्लस श्रेणी प्राप्त झाले आहे.  महाविद्यालयाने नव्याने सुरू केलेली विज्ञान शाखा त्यासाठी केलेले नवीन इमारतीचे निर्माण त्याचबरोबर ग्रंथालय, क्रीडा, पर्यावरण व  सामाजिक क्षेत्रात राबविलेले विविध उपक्रम तसेच संशोधनाच्या क्षेत्रात महाविद्यालयातील प्राध्यापकांनी दिलेले योगदान व गेल्या पाच वर्षात माजी प्राचार्य डॉ.  प्रमोद पवार व डॉ.अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने राबविलेले विविध अभिनव उपक्रम, याचबरोबर प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रवासात सातत्याने प्रोत्साहन व पाठिंबा देणारे संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी.डी. पाटील महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन के. डी. पाटील तसेच सर्व संचालक मंडळ यांचे देखील त्यांनी आभार मानले. यानंतर फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा कण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. राहुल इंगळे, डॉ. किशोर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. प्रविण पवार, डॉ. जयवंतराव पाटील, डॉ. महादेव तोंडे, कैलास अहिरे, एस. बी. गिरासे, विष्णू शेट्ये, राजेंद्र पाटील, विवेक पवार, कल्याण पाटील, विनोद पाटील , राहुल पुकडे आदी उपस्थित होते. तर महाविद्यालयाने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डी. डी. पाटील, महाविद्यालयाचे चेअरमन के. डी. पाटील, सचिव राधेश्याम पाटील, संचालक शैलेंद्र पाटील यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील यांचे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *