अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथुन जवळच असलेल्या धार येथे पीर बाबा रस्त्याला असलेल्या गावालगत असलेल्या माधव दंगल पाटील यांच्या मालकीच्या शेतातील जवळपास पाच एकर क्षेत्रावर उसाची लागवडीत त्याची तोडणी चालूच होती त्यातील एक एकर ऊस तोडणी झाली असताना काल १२ रोजी सायंकाळी ५ वाजता उसाचे शेतीतून गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या वीज ताराच्या स्पर्श होताच चार एकर क्षेत्रात असलेल्या ऊसाला आग लागली होती हे गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली व धारचे पोलीस पाटील जगतराव पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात ऊस जळल्याची खबर दिल्यावरून मारवड पोलिसांनी अमळनेर नगरीच्या नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांना भ्रमणध्वनिवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली व तात्काळ अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या दोन फायर फायटर गाड्याचे बंब व एक पाण्याचे टँकरने घटनास्थळी दाखल झाले व नगरपरिषदेचे फायरमन प्रमुख नितीन खैरनार फारुख शेख , छोटू मराठे, दिनेश पाटील, वसीम पठाण, मच्छिद्र पाटील यांना एकतासाचे अथक परिश्रम व प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले मात्र तरी या आगीत माधवराव पाटील यांच्या शेतातील जवळपास चार एकर क्षेत्रावर उभा असलेला ऊस जळून खाक झाला असून त्यात ठिबकच्या नळ्या व पीव्हीसी पाईप व पाईपलाईन सह दोन कूपनलिकाच्या वायरीही जळून खाक झाल्या आहेत त्यामुळे वीज ताराच्या स्पर्श होऊन लागलेल्या या आगीत संबंधित शेतकऱ्यांचे चार एकर उसासह , ठिबकच्या नळ्या व कूपनलिकेच्या वायरी मिळुन जवळपास एकूण साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज धारचे पोलिस पाटील जगतराव पाटील यांनी व्यक्त केला, या घटनेची माहिती अमळनेर येथील तहसील कार्यालयात ही पोलीस पाटील व सरपंच यशवंत पाटील यांनी कळविण्यात आले असून संबंधित शेतकऱ्यांचे नुकसानी बाबत उद्या सकाळी तलाठी पराग पाटील यांना पाठवून घटनास्थळी झालेल्या उसाच्या व इतर शेतोपयोगी साहित्याचा नुकसानीचा पंचनामा केला जाईल असे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगितले.