मानमोडी व लवकी नाला काठावरील शेतीला मिळणार सिंचनाची संजीवनी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मानमोडी नाला खोलीकरणाच्या कामाचा आ शिरीष चौधरींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला,मानमोडी नाला हा लवकी नाल्यास जोडणारा नाला असल्यामुळे दोन्ही नाला काठावरील शेतीला एकप्रकारे सिंचनाची संजीवनी मिळून शेतकरी बांधवाना विशेष लाभ होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून मानमोडी नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने या नाल्यातील पाण्याचा प्रवाह अत्यंत कमी होऊन परिणामी जलसिंचन होत नव्हते यामुळे शेती पिकासाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होत होता,हि बाब आ चौधरी यांनी लक्षात घेऊन जलयुक्त शिवार अंतर्गत या नाल्याच्या खोलीकरणास मंजुरी मिळविली असून जोमाने काम सुरु झाले आहे.तसेच या नाल्याजवळील लवकी नाल्यावर आ चौधरींच्याच प्रयत्नाने बंधारा दुरुस्ती चे काम झाल्यामुळे याचा देखील अधिक फायदा शेतीसाठी होणार आहे.मतदार संघात जलयुक्त साठी मोठा निधी आ चौधरी यांनी खेचून आणल्याने अनेक गावांत मोठ्या प्रमाणात नाला खोलीकरणाची कामे सुरू असून याचे फलित येत्या पावसाळ्यात दिसून येणार आहे.
खोलीकरनाच्या शुभारंभ प्रसंगी तालुका कृषी अधिकारी बी व्ही वारे, मंडळ अधिकारी प्रदीप निकम, मंडळ अधिकारी वाय.ए.बोरसे, कृषी पर्यवेक्षक ए.एस. खैरनार,कृषी सहायक राजेश बोरसे, योगेश कदम, मा सरपंच राजेंद्र पाटील, व्हाइस चेअरमन विकासो मुडी बाळासाहेब सदांनशीव, सुनील भामरे, पंकज चौधरी,मुडी सरपंच काशिनाथ माळी, बोर्दडे सरपंच संतोष चौधरी, उपसरपंच नारायण पाटील, रामचंद्र पाटील, योगेश सोनवणे, नागराज चौधरी,चंद्रसेन पाटील, बी ए पाटील, गजू महाराज, दौलत बोरसे,दिनेश पाटील, गंभीर पाटील, भानुदास पाटील, अविनाश पाटील, प्रदीप पाटील, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते