अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या जुबेद पिंजारी यास ३ वर्षांची शिक्षा

अमळनेर (प्रतिनिधी)चोपडा तालुक्यातील वडती येथे अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या जुबेद पिंजारी यास ३ वर्षांची शिक्षा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने ठोठावली असून चार वेगवेगळ्या कलमान्वये शिक्षा व दंड ठोठावला आहे
९ ऑक्टोबर २०१६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जुबेद राजू पिंजारी हा आपल्या चुलत बहिणी सोबत नवरात्र उत्सव पाहून घराकडे पायी परतत असताना गावातील मारुती मंदिरा जवळ चौकापुढे अंधाऱ्या जागेत फिर्यादी सोळा वर्षे तरुणीचा हात पकडून विनयभंग केला व तू मला मी तुझा मोबाईल नंबर देत नाही असे सांगत छेडछाड केली त्यावेळी पीडित तरुणीने आरडाओरडा केला यावेळी ही घटना पाहून पीडित तरुणीचा भाऊ दीपक कोळी हा त्या ठिकाणी आला माझ्या बहिणीला का अडवले अशी विचारणा केली असता यावेळी याबाबीचा राग येऊन जुबेद पिंजारी यांने खिशातील दारूची बाटली काढून दीपक याच्या डोक्यात मारली यावेळी दारूच्या बाटलीमुळे दीपक याच्या डोके रक्तबंबाळ होऊन तो जखमी झाला यावेळी आरोपीने तेथून पळ काढला त्यानंतर रात्री अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व सदर प्रकरणात डीवायएसपी सदाशिव वाघमारे यांनी तपास केला होता सरकारी पक्षातर्फे एड किशोर आर बागुल मंगरुळकर यांनी खटल्याचे काम पाहिले त्यात एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले यात सर्वात महत्वाची साक्ष पीडित तरुणी व जखमी भाऊ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज पाटील यांची साक्ष महत्वाची ठरली अति जिल्हा व सत्र न्या राजीव पी पांडे यांनी यावेळी आरोपीस जुबेद यास बाळ लैंगिक अत्याचार कायदा कलम ८ प्रमाणे ३ वर्ष शिक्षा व १ हजार रुपये दंड व कलम १२ प्रमाणे १ वर्ष शिक्षा व एक हजार रु दंड भांदवी कलम ३२४ अन्वये दीपक यास जखमी केल्या प्रकरणी १ वर्ष शिक्षा व २ हजार रुपये दंड तर ३२३ प्रमाणे पीडित तरुणीशी हुज्जत घातल्याप्रकरणी ६ महिने अशी शिक्षा सुनावली आहे.
कैदीपार्टी पोलिस नाईक अशोक साळुंखे सह इतर पोलिस सोबत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *