अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कावपिंप्री व इंद्रापिंप्री गावातील चार तरुण एकाच वेळी भारतीय सैन्य दलात भरती झाल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे, विशेष म्हणजे सर्वच तरुण सर्वसामान्य कुटुंबातील आहेत.
यामध्ये गौरव राजेंद्र पाटील हा सहा महिन्यांपूर्वीसैन्य दलात भरती झाला असून तो सध्या जम्मू येथे प्रशिक्षण घेत आहेत, तर त्याचा सख्ख्या लहान भाऊ सौरव रविंद्र पाटील, राजेश दिपक पाटील, हितेश विश्वास पाटील आणि शुभम अनिल पाटील हे चारही तरुणांची, संभाजी नगर येथे झालेल्या सैन्य दलाच्या भरतीत एकाच वेळी निवड झाल्याने त्यांच्या परिवारासह गावात आनंदाचे वातावरण आहे, तर
सैन्यभरती साठी तयारी करणाऱ्या तरूणाई साठी ते प्रेरणादायी ठरत आहे. पदवी पर्यंतचे शिक्षण घेऊन शासकीय नोकऱ्या मिळत नसल्याने गावागावात विद्यार्थी मोठ्या संख्येने भरतीची तयारी करतात. त्यातून काहींची निवड होते अन तेच तरुण इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात भारतीय सैन्य दलात दाखल झालेल्या तरुणाचे अभिषेक पाटील मित्र परिवाराकडून व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.