खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मामाच्या गावाहून घरी येताना मुडी प्र. डांगरी येथील तरुणाने तापी नदीत आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी) मामाच्या गावाहून घरी येताना मुडी प्र. डांगरी येथील तरुणाने तापी नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना १४ रोजी घडली. त्याचे शव दि १६ रोजी तापी नदीपात्रात तोरखेडा (ता. शहादा) जवळ आढळून आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, गिधाडे (ता. शिरपूर) येथे मामाच्या गावी तो गेलेला असतांना मामाच्या घरातील कुटुंबाला निरोप देऊन निघालेल्या उमेश कैलास सोनवणे वय (३०) याने दि १४ रोजी रस्त्यात मुडी प्र डांगरी येथे येत असतांना सव्वाबाराच्या सुमारास गिधाडे गावाजवळ पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. तो उडी मारतांना गिधाडे येथील एका व्यक्तीने ही माहिती त्याच्या कुटूंबियांना दिली. १४ पासून घरचे कुटुंबीय त्याचा नदीपात्रातील गावात शोध घेत होते. ते प्रेत तोरखेडा शहादा येथे सापडले त्याच्या आधार कार्ड वरून सारंगखेडा पोलिसांनी कुटुंबियांना दिली. दि. १६ रोजी त्याचे काका शरद उत्तम सोनवणे यांनी याबाबत माहिती दिल्यावरून सारंगखेडा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. नातवाईकांनी प्रेत ताब्यात घेऊन त्याच्यावर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शोकाकुल परिस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button