आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर (RAF) जवानांचे पथसंचालन.
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरात आगामी सण-उत्सव व लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर आल्या असताना जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण असावी यासाठी अमळनेर पोलिस दलासह मुंबईच्या रॅपीड
अॅक्शन फोर्सच्या(RAF) जवानांनी आज रविवारी शहरातील मिरवणूक मार्गावरून अत्याधुनिक शस्र ,बंदुका , दंगा काबू पथक वाहन , लाठ्या असे साहित्य घेऊन कर्मचारी पथसंचलनात सहभागी होत सशस्त्र रूट मार्च (पथसंचलन) केले. या पथसंचलनामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली तर उपद्रवींच्या उरात मात्र चांगलीच धडकी भरली.
मुंबई बटालियन क्रमांक १०२ चे पथक जिल्ह्यात ३१ डिसेंबर पासून दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील संवेदनशील गावामध्यं पथसचलन करून जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण केली जात आहे. अत्याधुनिक शस्त्र साहित्यासह सहभागी झालेल्या जवानांना पाहण्यासाठी शहरात मोठी गर्दी झाली होती.
शहरातील प्रमुख मार्गावरून पथसचलन..
अमळनेर शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वात रॅपीड अॅक्शन फोर्सचे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वतंत्र कुमार, रमेश वर्मा, अॅक्शन फोर्सचे पोलिस निरीक्षक निताई पॉल, रणविजय कुमार,गोविंद तरफदार, गणपत सिंग, पोलिस उपनिरीक्षक राजेश पंजे, स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक खैरनार, पोलिस उपनिरीक्षक चातुरे, पोलिस उपनिरीक्षक लबडे, किशोर पाटील, सुनिल हटकर, प्रमोद पाटील, हितेश चिंचोरे, बापू साळुंखे, पुरुषोत्तम पाटील, प्रविण पाटील, प्रशांत पाटील,मिलिंद बोरसे,यांच्यासह सुमारे 60 कर्मचाऱ्यांचा सशस्त्र पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गांधलीपुरा पोलीस चौकी पासून पाच कंदील चौक , दगडी दरवाजा , सराफ बाजार , वाडी चौक , माळी वाडा , कसाली मोहल्ला , झामी चौक , वड चौक , त्रिकोणी बगीचा , पाच पावली मंदिर , बसस्थानक , महाराणा प्रताप चौक मार्गे जुन्या पोलीस स्टेशन पर्यंत प्रमुख मार्गावरून संवेदनशील भागात पथसंचालन करण्यात आले.