अमळनेर (प्रतिनिधी) स्पोर्ट्स डे निमित्त रोटरी क्लब व प्रताप महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा झाल्या. त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्याचे मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते दि. 6 सप्टेंबर रोजी प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात सकाळी 10 वाजता होणार आहे. तसेच अनिल पाटील व विजेते खेळाडू यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी क्लबचे सचिव विशाल शर्मा व जिमखाना चेअरमन डॉ. संदीप नेरकर यांनी केले. या स्पर्धेत बॅडमिंटनसाठी 72 एन्ट्री, टेबल टेनिससाठी 47 एंट्री बुद्धिबळसाठी 40 एंट्री व व्हॉलीबॉलसाठी 48 एंट्री आली होती.
स्पर्धेतील विजेते खेळाडू
बॅडमिंटन मेन्स सिंगल खुला गट विजेता प्रशांत सर, उप विजेता कृष्णा वर्मा, बॅडमिंटन अंडर 14 विजेता शौर्य ससवानी, उप विजेता चिन्मय पाटील, बॅडमिंटन वुमन्स खुला गट विजेता आर्या भंडारकर, उपविजेता स्नेहल पाटील, बॅडमिंटन वुमन्स अंडर 14 विजेता आर्या भावसार, उपविजेता तनया पिंगले, बॅडमिंटन मेन्स डबल विजेता गोसावी सर व प्रशांत सर, उपविजेता डॉ. संदीप नेरकर व अमोल मानके, बुद्धिबळ मेंस खुला गट विजेता विवेक बडगुजर, उपविजेता गारगॅश शिरसाठ, बुद्धिबळ वुमन्स खुला गट विजेता अक्षरा साळुंखे, उपविजेता साक्षी चौधरी, बुद्धिबळ अंडर 14 मेन्स विजेता रितेश पाटील, उपविजेता कौस्तुभ शिंपी, बुद्धिबळ अंडर 14 वुमन्स विजेता ग्रांथी पटेल, उपविजेता भाविका बारी, टेबल टेनिस मेन्स खुला गट विजेता रोहन मुंदडा, उपविजेता रोहित गव्हाणे, टेबल टेनिस अंडर फोर्टीन मेन्स विजेता देवेश निकुंभ, उप विजेता शिवानंद राणादिवे, टेबल टेनिस वुमन्स खुला गट विजेता भार्गवी परमार, उपविजेता रिया अहीर, टेबल टेनिस अंडर 14 विजेता धनश्री दुसाने, उपविजेता अक्षरा पाटील, तसेच व्हॉलीबॉल मेन्स रविभाऊ टीम विजेता संदीप भाऊ टीम, उपविजेता, व्हॉलीबॉल वुमन्स प्रताप कॉलेज टीम ए विजेता प्रताप कॉलेज टीम बी उपविजेता.