पाडळसरे धरणाचे उजव्या तीरावर वाहन पलटी चार जण जखमी,उपचार सुरू

तापी नदिच्या खोल दरीत पडलेली महेंद्रा बोलेरो हे वाहन

अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसरे येथे तापी नदीवर साकारण्यात येत असलेल्या पाडळसरे धरणाचे उजव्या तिरावरून नदीपात्रात पैल तीरावर जनेयेन्यासाठी अमळनेर व शिरपूर तालुक्यातील नागरिक कच्या रस्त्याच्या वापर करून ये जा करीत असतात त्यात पैल तीरावरील पिळोदे ता शिरपूर येथे जिओ टॉवरचे काम निर्माणाधिन असून तेथे काम करीत असताना रात्र झाल्याने तेथून परत पाडळसरे मार्गे पढावद ता शिंदखेडा येथे जाण्यासाठी निघाले असता धरणाचे उजव्या तीरावर कच्या रस्त्याने येत असताना काल दिनांक ३१ रोजी रात्री १०:३० नंतर रस्त्याचा अंदाज चुकून पायवाट वरून थेट खोल दरीत पलटी होत गेल्याने एम एच १८- बीजी ३०८३ या क्रमांकाची महेंद्रा बोलेरो ही मालवाहतूक करणारे खाजगी वाहन गाडीत असलेल्या मोठया जनरेटर सह पलटी होऊन खोल दरीत कोसळल्याने या वाहनात असलेले वाहन चालक व इतर तीन मजूर जखमी झाले असून नातेवाईक व गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून वर आणल्यावर दीपक पवार वय ३० व प्रवीण पाटील वय ३४ दोन्ही राहणार पढावद ता शिंदखेडा व प्रमोद सोनवणे वय २५, दिपक पाटील वय ३२ दोन्ही राहणार शिरपूर हे चार जण जखमी झाले आहेत, या जखमींना शिरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले, हे पलटी झालेले वाहन काल दिनांक १ रोजी दुपारी ४ वाजता क्रेन मागवून काढण्यात आले असून वरील जखमींतील एकाचे दोन्ही हात फ्याक्चर असल्याचे व इतरांना मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली असून प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *