खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

म्हसले बस स्टँड जवळ मोटारसायकलच्या धडकेत वृद्ध ठार, पोलिसांत गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) मोटारसायकलच्या धडकेत एक वृद्ध ठार झाल्याची घटना दि. ३० जुलै रोजी म्हसले बस स्टँड जवळ घडली.

म्हसले येथील रहिवासी गुलाब तुकाराम पाटील (वय ६४)  हे संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास म्हसले बस स्टँड जवळील मुतारीत लघवी करुन परत येत असताना रोडच्या कडेला रोड ओलांडण्यासाठी उभे होते. त्यावेळी टाकरखेडा गावाकडुन धरणगावकडे येणारी तीनजण बसलेले मोटारसायकल (क्र एम एच १९ डीटी ६०३६ ) वरील चालक विनोद पुंजु मोरे व त्याच्या सोबत असलेले जितेद्र मगन पाटील (दोन्ही रा. टाकरखेडा), अमोल बाबुराव भिल (रा. औरंगपुर) यांनी जोरदार धडक दिली. त्यात धरणगाव जळगाव येथे नेऊन उपचारादरम्यान त्यांचा ३१ रोजी सायंकाळी ६.१० मिनिटांनी मृत्यू झाला आहे. याबाबत मयताचा पुतण्या शरद मुरलीधर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विनोद पुंजू मोरे याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.हे.कॉ. संदेश पाटील हे करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button