अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील तरुणाने कर्जबाजारी पणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 18 रोजी रात्री घडली. सुनील मधुकर पाटील (वय -41) असे तरुणाचे नाव असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील पाटील हा श्रीराम मंदिराजवळ भाड्याच्या घरात राहत होता. त्या घराला लागत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ओट्यावरील संडास मध्ये जात दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सुनील पाटील यांनी रात्री गळफास घेतला होता. सकाळी मुले उठल्यावर त्यांच्या वडिलांना शोधायला लागल्यावर त्यानी गावात नातेवाईक यांच्याकडे शोधाशोध केली. मात्र आज दुपारपर्यंत सुनील मुलांना त्याच्या भावाला कुठेच दिसून आला नाही. जिल्हा बँकेत दुपारी कर्मचारी प्रसाधन गृहात गेल्यावर सुनील याने फासी घेतल्याचे दिसून आले. सुनील पाटील यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्याला दोन मुले आहेत. स्वतः हातावार स्वयंपाक करून खाऊ घालत होता. त्याच्यावर कर्ज झाल्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. शेती व मजुरी तो करीत होता. नापीकी व बचत गटाचे कर्ज यामुळे तो नैराश्यात होता. मुलांचे आई व वडिलांचे छत्र हरपल्याने मुलांचा आक्रोश मनाला हेलावाणारा होता. ग्रामीण रुग्णालयात डॉ. प्रकाश ताळे यांनी शवविछेदन केले. नारायण पाटील यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनील पाटील यांच्यावर सायंकाळी साडे सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पच्यात आई वडील, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.