अमळनेर (प्रतिनिधीl) येथील संताच्या प्रसिद्ध व पावन तसेच प्रती पंढरपुर म्हणुन ओळखली जाणाऱ्या अमळनेर नगरीतील श्री. अंबरीष ऋषि महाराज टेकडीवरील गुरूवारी यात्रोत्सव भरणार आहे.श्री . अंबरीषजी ऋषि महाराज व टेकडीवर गेल्या अनेक वर्षापासून हा यात्रोत्सव होत असून सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत ही यात्रा पार पडत असते. यात्रेनिमित्त अनेक खेळणी व खाद्य पदार्थाची दुकाने थाटली जातात.याठिकाणी असलेल्या मंदिरावर दर्शनासाठी गर्दी होत असते. सदर टेकडीवर गेल्या काही वर्षात 35 ते 40 हजार झाडे लावण्यात आली असून यासाठी टेकडी गृपने अथक परिश्रम घेतले आहे. वृक्ष लावणे व जगवणे तसेच चारी खणुन पाणी जिरविण्याचे व ड्रमच्या ( कँन ) सहाय्याने टेकडी परिसराच्या कान्याकोपर्या पर्यंत वृक्षांना पाणी देण्याचे कार्य हे श्रमदानातुन व लोकसहभागातुन टेकडी ग्रुप करत आहे. तसेच त्या वृक्षांना पाणी देणे त्यांची निगा ठेवणे व त्यांना जगवणे हे पर्यावरणाला पोषक व सृष्टि साठी महत्वपूर्ण तसेच हे एक दैविक कार्य हे करत आहे. यामुळे टेकडीचे नैसर्गिक सौंदर्य वाढण्यास मदत झाली आहे. टेकडीवर यात्रेला किंवा यात्रेनंतर कधीही आल्यावर नास्ता व जेवण केल्यावर उरलेले अन्न व कागद, युज । थ्रो काही वस्तु रद्दी पेपर अश्या वस्तु इकडे तिकडे न फेकता सरळ आपण आणलेल्या (कँरिबँग) पिशवीत भरुन श्री. अंबरीषजी ऋषि महाराज टेकडी ग्रुप सदस्यांन कडे जमा करावी किंवा मंदिरा जवळच मोठा ओटा आहे त्याच्या मागिल बाजूस नेऊन टाकावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच भाविकांनी आपआपल्या गाड्या व मोटारसायकली टेकडीच्या खालच्या बाजुस लावाव्या व चालतांना फिरतांना आपल्या मुळे आपल्या पायदळी वृक्षांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच टेकडीच्या खाली पायर्यांन जवळ व टेकडीच्या दर्यांन मध्ये सी.सी.टी,अंतर्गत बंधार्याचे खोलीकरण पाणी अडविण्यासाठी काम सुरु आहे. तरी येतांना व जातांना काळजी पुर्वक लक्ष ठेवून सावधानी ने टेकडी भ्रमण करावी व जिथे पाण्याचा डाब दिसेल तिथे कृपया जाऊ नये किंवा पाण्यात उतरु नये असेही आवाहन करण्यात आले आहे.