

अमळनेर (प्रतिनिधी) शिरसोली येथे संपन्न झालेल्या ८ व्या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनामध्ये एकुण ३०१ उपकरणांचा सहभाग होता.त्यापैकी राज्यस्तरावर निवड़ीस पात्र झालेल्या १६ उपकरणांमध्ये अमळनेर येथील श्रीमती.द्रौ.रा.कन्याशाळेतील कु.हेतल योगेश झाबक (ई.9 वी अ) हिच्या सुरक्षित माझे वाहन या उपकरणास सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे.
तिला प्रमुख मार्गदर्शन के.पी.सनेर यांनी केले.तिच्या यशात खा.शी. मंडळ कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, शाळा समिती चेअरमन जितेंद्र जैन व सर्व संचालक मंडळ यांची प्रेरणा होती.तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सोनवणे जे.के. उपमुख्याध्यापक ठाकुर डी.एच. ,पदाधिकारी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील कौतुक केले.अरिहंत फर्निचर चे जितेंद्र झाबक यांची ती पुतणी तर योगेश झाबक यांची मुलगी आहे.